मुंबई: बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ T20 विश्वचषक 8 व्या मोसमाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 बाद 137 धावा केल्या. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला तर इंग्लंडने भारतावर १० गडी राखून मात केली. या दोन्ही संघांना दुसऱ्या T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.
इंग्लंडने पहिल्या 8 षटकात 3 गडी गमावून 61 धावा केल्या आहेत. बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूक ही जोडी क्रीझवर उभी आहे. सात विकेट शिल्लक असताना इंग्लंडला विजयासाठी 60 चेंडूत 61 धावांची गरज आहे. सध्या मैदानावर ब्रूक आणि स्टोक्स फलंदाजी करत असून, 3 विकेट गमावत इंग्लंडने पहिल्या 10 षटकात 77 धावा केल्याआहेत. ब्रूक आणि स्टोक्स दोघेही चांगली फलंदाजी करत असून दोघांच्या खेळीने हा विजय जवळ आणला आहे. इंग्लंड हा सामना जिंकला तर तो विश्वचषक आपल्या नावावर करेल.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: इंग्लंडने गमावल्या 2 विकेट; ‘ही’ जोडी करत आहे चांगली खेळी
- ICC T20 World Cup 2022: इंग्लंडने जिंकले नाणेफेक; पाकिस्तान करणार प्रथम फलंदाजी