मुंबई: मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर आज पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात T20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 बाद 137 धावा केल्या. पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा तर इंग्लंडने भारताचा पराभव केला. दोन्ही संघांच्या नजरा दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यावर आहेत.
पाकिस्तानने दिलेल्या 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने सलामीवीर अॅलेक्स हेल्सला बोल्ड करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. दोन चेंडूंत एक धाव घेऊन हेल्स बाद झाला. इंग्लंडने 3 षटकात 1 गडी बाद 28 धावा केल्या आहेत.
इंग्लंडचा संघ चांगली खेळी करत असला तरी इंग्लंडचेही काही खेळाडू लवकर आउट होऊन परतले. कर्णधार बटलर आजूनही मैदानावर खेळत असून तो चांगली खेळी करताना दिसून आला. त्याच्या जोडीला स्टोक्स ही त्याला साथ देतो आहे. पाकिस्तानची गोलंदाजी आज लयात असलेली दिसत आहे.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या गोलंदाजासमोर झाला गारद; अंतिम सामना जिंकण्यास इंग्लंडसमोर अवघ्या 138 धावांचे लक्ष्य
- ICC T20 World Cup 2022: खरा हिरो कोण बाबर कि बटलर; जाणून घ्या अंतिम सामन्यापूर्वी या आकडेवारीतून