मुंबई: मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर आज पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात T20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शान मसूदच्या 38 धावा आणि कर्णधार बाबर आझमच्या 32 धावांच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून 137 धावाच करू शकला. इंग्लंडकडून सॅम कुरनने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा तर इंग्लंडने भारताचा पराभव केला. दोन्ही संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे लक्ष देत आहेत. पाकिस्तानने 2009 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता तर इंग्लंडने त्याच्या एका वर्षानंतर म्हणजे 2010 मध्ये ही कामगिरी केली होती. इंग्लंडला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानला सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे, कारण आतापर्यंत दोन्ही संघ टी-20 विश्वचषकात दोनदा आमनेसामने आले आहेत, जिथे पाकिस्तानला दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला आहे.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: इंग्लंडने जिंकले नाणेफेक; पाकिस्तान करणार प्रथम फलंदाजी
- ICC T20 World Cup 2022: ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरने रोहितवर ओढले ताशेरे; याविषयी केले भाष्य