मुंबई: झिम्बाब्वेविरुद्धच्या T20 विश्वचषक सुपर 12 च्या अखेरच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळाली आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अशा स्थितीत हा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवत अंतिम चारमध्ये जाण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे, दिवसाच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मोठा अपसेट केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याचवेळी, दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या पराभवासह बांगलादेशचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला.
T20 विश्वचषक सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघ भिडत आहेत. भारताने चांगली सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा अवघ्या १५ धावाच बनवून लवकर आउट झाला. उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केलेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकून गट दोनमध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरी गाठता येईल. भारताने सुरुवात चांगली केली असल्याने संघाकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेला विजय मिळवून परतायची आशाआहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: ‘या’ संघाची धडाकेबाज कामगिरी; उपांत्य फेरीत स्वतःची जागा केली पक्की
- ICC T20 World Cup 2022: घातक खेळीने हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर; उपांत्य फेरीत मिळेल स्थान