मुंबई: मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर आज पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात T20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाली आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा तर इंग्लंडने भारताचा पराभव केला. दोन्ही संघांच्या नजरा दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यावर आहेत.
पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाली असून यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम ही सलामीची जोडी क्रीझवर उतरली होती. दोघांनीही चांगली सावध सुरुवात केली असताना पाचव्या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सॅम कुरनने मोहम्मद रिझवानला बोल्ड करून इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. रिझवान 14 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. यष्टिरक्षक फलंदाज रिझवानने आपल्या छोट्या डावात षटकार ठोकला. पाकिस्तानने 5 षटकात 1 गडी बाद 29 धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी अष्टपैलू बेन स्टोक्सने गोलंदाजीची सुरुवात केली.
मैदानावर बाबर आजम आणि मोहम्मद हारिस ही जोडी चांगली फलंदाजी करत असताना पाकिस्तानने एक गडी गमावत चांगली धावसंख्या उभारली होती. मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा युवा सेन्सेशन मोहम्मद हरिस मैदानात उतरला. कर्णधार बाबर आझमच्या साथीने त्याने डाव पुढे नेला. त्यानंतर त्याने आक्रमक खेळ खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याची विकेट त्याने गमावली. आदिल रशीदने त्याला 8 धावांवर बेन स्टोक्सकरवी झेलबाद केले.
मैदानावर सध्या बाबर आझम आणि शान फलंदाजी करत असून त्यांना चांगली खेळी करून धावसंख्या अधिक करण्यासारखी खेळी करावी लागणार आहे. पाकिस्तानने २ गडी गमावून ९ षटकात ५९ धावा केल्या आहेत.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: खरा हिरो कोण बाबर कि बटलर; जाणून घ्या अंतिम सामन्यापूर्वी या आकडेवारीतून
- ICC T20 World Cup 2022: ‘हा’ संघ पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास सज्ज; एमसीजीवर रंगणार विश्वचषकाचा अंतिम सामना