मुंबई: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपल्या देशाचा महान क्रिकेटपटू इम्रान खानच्या कामगिरीची बरोबरी करण्यापासून फक्त एक सामना दूर आहे. यासाठी नर्व्हस होण्याऐवजी तो खूपच उत्साहित असल्याचे तो सांगतो. रविवारी एमसीजीवर टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा संघ इंग्लंडशी भिडणार आहे. पाकिस्तानला दुसऱ्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. हा संघ यापूर्वी २००९ मध्ये चॅम्पियन बनला होता.
बाबरने शनिवारी सांगितले की, “मी नर्व्हसपेक्षा जास्त उत्साही आहे कारण आम्ही आमच्या मागील तीन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.” आझम म्हणाला, याच्यात काहीच शंका नाही कि, दबाव असतो पण याला फक्त आत्मविश्वास आणि स्वतःवरच्या विश्वासानेच दाबून ठेवले जाऊ शकते. आणि चांगल्या निकालासाठी प्रत्येकाने तसे करणे आवश्यक आहे. ते मान्य करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही कि शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि हरिस रौफ ही चौकडी त्यांच्या संघाची ताकत आहे.
बाबर आझम म्हणाला, “इंग्लंड संघ खूप स्पर्धात्मक आहे, भारताविरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरी गाठणे हा त्याचा पुरावा आहे. आमची रणनीती आमच्या योजनेवर टिकून राहणे आणि आमच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा फायनल जिंकण्यासाठी आमची ताकद म्हणून वापर करणे हे असेल.” बाबरसाठी 1992 च्या पराक्रमाशी बरोबरी करणे ही सन्मानाची गोष्ट असेल. 30 वर्षांपूर्वी इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ इंग्लंडला पराभूत करूनच एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन बनला होता.
“हो, मला वाटतं की आमची सुरुवात चांगली झाली नसावी पण आम्ही चांगल्या लयात परतलो. गेल्या तीन-चार सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघ वैयक्तिक आणि सांघिक स्तरावर चांगला खेळला आहे. “आम्ही या यशासाठी खूप मेहनत घेत आहोत. अंतिम फेरीत पोहोचणे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटते.” बाबर आणि त्याचा सलामीचा जोडीदार मोहम्मद रिझवान पहिल्या सहा षटकांमध्ये मिळालेल्या संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.
तो म्हणाला, “पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त विकेट्स मिळवणे ही सामन्याची गुरुकिल्ली आहे. तुम्ही फलंदाजी करत असतानाही तुम्हाला येणाऱ्या फलंदाजांसाठी चांगली गती निर्माण करायची असते. आझम म्हणाला, “आम्ही ही गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करू जेणेकरुन आम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकू.” त्याने कबूल केले कि,जेव्हा गटातील साखळी सामन्यांमध्ये मोठ्या धावा करता आल्या नाहीत तेव्हा त्याच्यावर खूप दबाव होता.
आझम म्हणाला, “साहजिकच जेव्हा तुम्ही चांगल्या धावा करत नसाल तेव्हा तुमच्यावर खूप दडपण असते. पण मी मधल्या फळीचे कौतुक करू इच्छितो, त्यांनी जबाबदारी घेतली आणि मी आणि रिजवान जे करू शकलो नाही ते साध्य केले.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: ‘हा’ भारतीय स्टार खेळाडू परतला मायदेशी; विमानतळावर चाहत्यांशी झाला सामना… पहा सविस्तर वृत्त
- ICC T20 World Cup 2022: भारताच्या पराभवावर पाकिस्तानी PM ही बरळले; यावर ‘या’ भारतीयाने दिले चोख प्रत्युत्तर