मुंबई: T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) चा दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लिश संघाने 10 गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. दारुण पराभवानंतर भारताने चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मावर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानीही भारतावर टीका करण्यापासून मागे हटले नाहीत. यावेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बटनेही रोहित शर्मावर ताशेरे ओढले आहेत.
रोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीने निराशा केली आहे. त्याने 6 सामन्यात केवळ 116 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धची सलामीची जोडी स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र, विराट कोहलीचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या 63 धावांच्या तुफानी खेळीमुळे भारतीय संघाने 168 धावांपर्यंत मजल मारली. हार्दिकने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 आकाशी षटकार मारले. दरम्यान, सलमान बटने फिटनेसबाबत रोहित शर्माला खडेबोल सुनावले.
शब्दांनी काही फरक पडत नाही – सलमान बट
सलमान बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर रोहितबद्दल म्हणाला, ‘रोहित शर्मापेक्षा चांगला खेळाडू कोणी नाही. पण क्रिकेटमध्ये फिटनेसला खूप महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही संघाचे नेतृत्व करता आणि खेळाडूंकडून 100 टक्के अपेक्षा ठेवता, परंतु तुम्ही स्वत: संथ असल्यास, खेळाडू तुमच्या पाठीमागे तक्रार करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तुम्ही हवेत मोठे फटके खेळत पॅव्हेलियनमध्ये परतत राहता आणि इतरांना धोकादायक फटके न खेळण्याचा सल्ला देता. शब्दांनी काही फरक पडत नाही, तुम्हाला तुमच्या कृतीतून दाखवावे लागेल.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: भारताच्या पराभवावर आता ‘हा’ आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर बरळला; पहा काय म्हणाला तो
- ICC T20 World Cup 2022: पराभवावर ‘हा’ खेळाडू झाला भावूक; पहा काय केली भावनिक पोस्ट