मुंबई: टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी अॅडलेडमध्ये खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने 20 षटकात 6 विकेट गमावत 168 धावा केल्या.
भारताने दिलेल्या 168 धावांचे आवाहन पूर्ण करताना बट्लर आणि हेल्स यांनी धमाकेदार खेळी करत एकही विकेट न गमावता उत्तम फलंदाजीचा नमुना सादर केला. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारतावर 10 गडी राखून मात केली. त्यांनी 169 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या. त्याबदल्यात इंग्लंड संघाने 16 षटकात एकही विकेट न गमावता 170 धावा केल्या आणि विजय आपल्या नावावर केला.
इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने 49 चेंडूत 80 धावा केल्या. भारताच्या सहापैकी चार गोलंदाजांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. भारतीय गोलंदाज या सामन्यात चांगली कामगिरी दाखवू शकले नाहीत.
आता फायनलमध्ये १३ नोव्हेंबर रोजी इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: भारताने इंग्लंडसमोर ठेवले 169 धावांचे लक्ष्य; जाणून घ्या डावातील मोठ्या गोष्टी
- ICC T20 World Cup 2022: जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सची झंझावाती फलंदाजी; इंग्लंडची खेळी मजबूत स्थितीत