मुंबई: विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर फॉर्मात आलेल्या कोहलीला रोखणे आता जगातील कोणत्याही गोलंदाजाच्या हाती राहिलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने इतिहास रचला. कोहलीने 15व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून इंग्लंडविरुद्ध 43 धावा करताच यासह आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4 हजार धावाही पूर्ण केल्या. परंतु तोही ५० धावा केल्यानंतर लगेच झेल देऊन आउट झाला.
आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा कोहली हा पहिला फलंदाज ठरला आहे. या खेळीपूर्वी कोहलीने 114 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या 106 डावांमध्ये 3 हजार 958 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि 36 अर्धशतके झळकावली. या काळात कोहलीचा स्ट्राईक रेट १३८ होता.
कोहली या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. उपांत्यपूर्व फेरीपूर्वी, त्याने गट 2 मध्ये खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांमध्ये 3 अर्धशतके केली होती आणि तिन्ही प्रसंगी तो नाबाद होता.
कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२, नेदरलँडविरुद्ध नाबाद ६२ आणि बांगलादेशविरुद्ध नाबाद ६४ धावा केल्या.
भारताने या सामन्यात खेळी करताना आत्तापर्यंत 164 धावा केल्या असून 5 विकेट गमावल्या आहेत
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: भारताला बसला तिसरा धक्का; सूर्यकुमार यादवही पॅव्हेलियनमध्ये परतला
- ICC T20 World Cup 2022: अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने कशी केली खेळी; जाणून घ्या आजच्या सामन्याविषयी