मुंबई: T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो १३ नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळेल. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघ सध्या फलंदाजी करत आहे.
रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. क्रिस जॉर्डनने रोहितला सॅम कुरनकरवी झेलबाद केले. डावाच्या नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर जॉर्डनने रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ५६ धावांच्या एकूण धावसंख्येवर भारताने रोहितची विकेट गमावली. रोहितने 28 चेंडूंत 4 चौकारांसह 27 धावा केल्या.
त्यानंतर लगेच आदिल रशीदने भारताला तिसरा धक्का दिला आहे. त्याने 12व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला बाद केले. सूर्यकुमार 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला.
भारताच्या पहिल्या १० ओवर मध्ये ६२ धावा केल्या असून लवकरच २ विकेट्स ही भारताने गमावले. पहिल्या १० ओवर मध्ये भारताची ही सुरुवात काहीशी संथच म्हणावी लागेल. सध्या मैदानावर हार्दिक पांड्या आणि विराट खेळी करत असून त्या दोघांकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. भारताने आतापर्यंत 13 षटकात 3 गडी बाद 80 धावा केल्या. विराट कोहली 31 आणि हार्दिक पंड्या 2 धावेवर नाबाद आहेत.
- हेही वाचा;
- ICC T20 World Cup 2022: भारताला सुरुवातीलाच मिळाला धक्का; के एल राहुल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला
- ICC T20 World Cup 2022: इंग्लंडने नाणेफेक जिंकले; टीम इंडिया करणार प्रथम फलंदाजी