मुंबई: उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी बांगलादेश आणि पाकिस्तान चा संघ प्रयत्न करताना दिसत आहे. आजच्या सामन्यात दोघाही संघांवर करो किंवा मरो अशी वेळ आली आहे. आज चालू असलेल्या या दोघांच्या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना सुमार खेळ खेळत ८ गडी विकेट गमावून फक्त १२७ धावाच तो करू शकला. त्यामुळे या धावसंख्येला प्राप्त करणे पाकिस्तानला अवघड जाणार नाही. असे असले तरी बांग्लादेशलाही कमी समजणे पाकिस्तानलाही महागात पडू शकते.
बांग्लादेशने दिलेल्या या धावसंखेच्या जोरावर पाकिस्तानने आपली सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या १० ओवरमध्ये १ विकेट गमावत पाकिस्तानने ६० रन्स बनवले असून चांगली खेळी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच पारड येथे मजबूत दिसते.
बांग्लादेशला ही या सामन्याकडून खूप अपेक्षा आहेत. हा सामना त्यांनी जिंकला तर उपांत्य फेरीत येण्याच्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. परंतु पाकिस्तानने जर हा सामना जिंकला तर पाकिस्तान उपांत्य फेरीत आपली जागा बनवेल. त्यामुळे या दोघांसाठी आजचा हा सामना महत्वाचा आहे.
पाकिस्तान या सामन्यात चांगली खेळी करत असून अजून पाकिस्तानला जिंकण्यासाठी अवघ्या काही धावांची गरज आहे. पाकिस्तान सध्या चांगल्या फॉर्म मध्ये दिसून येत आहे.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022 IND VS ZIM: भारतासाठी उद्याचा सामना असेल महत्वाचा; ‘या’ संघाला हलक्यात घेणे पडू शकते महाग
- ICC T20 World Cup 2022: सचिनचा विक्रम मोडण्याची ”त्याला” आहे संधी; पाहा कोण आहे ”तो” आणि कोणता आहे हा रेकॉर्ड