मुंबई: भारत आणि इंग्लंड हे संघ गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आमनेसामने येणार आहेत. हा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जाईल, जिथे टीम इंडियाने सुपर 12 फेरीत डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. द्रविडने प्लेइंग इलेव्हनचा विचार करणार असल्याचे मान्य केले आहे.
टीम इंडियाने सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने श्रीलंकेचा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. त्याने 5 पैकी चार सामने जिंकले आहेत. अॅडलेड ओव्हलची विकेट साधारणपणे फिरकीपटू अनुकूल मानली जाते.
अशा परिस्थितीत अक्षर पटेलच्या जागी अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकही पुनरागमन करू शकतो. झिम्बाब्वेविरुद्ध 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली. अॅडलेडची खेळपट्टी पाहूनच प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेणार असल्याचे द्रविडने सांगितले.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: उपांत्य फेरीत रोहितला दाखवावी लागेल कमाल; जाणून घ्या भारताच्या रणनीतीविषयी
- ICC T20 World Cup 2022: सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज