मुंबई: सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या डावात 35 धावा पूर्ण करताच भारतासाठी नवा इतिहास रचला. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणारा सूर्या पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा पराक्रम करता आला नव्हता. सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली आणि अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि यादरम्यान 3 षटकार आणि 5 चौकार लगावले. सूर्याने T20 विश्वचषकात तीन अर्धशतके झळकावली असून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
सूर्यकुमारने 24 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 61 धावांची खेळी केली. सूर्याच्या झंझावाती फलंदाजीमुळे भारताने शेवटच्या पाच षटकांत ७९ धावा जोडल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणारा सूर्या पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा पराक्रम करता आला नव्हता. सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली आणि अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि यादरम्यान 3 षटकार आणि 5 चौकार मारले. सूर्याने T20 विश्वचषकात तीन अर्धशतके झळकावली असून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
सन 2022 मध्ये आतापर्यंत, सूर्यकुमार यादवने 28 सामन्यांच्या 28 डावांमध्ये 44.60 च्या सरासरीने आणि 186.54 च्या स्ट्राइक रेटने 1026 धावा केल्या आहेत आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवच्या बॅटने विरोधी संघांवर धुमाकूळ घातला आहे. स्पर्धेत, त्याने सुपर 12 च्या पाच सामन्यांमध्ये 3 अर्धशतके झळकावली आहेत आणि 193.96 च्या स्ट्राइक रेटने 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. T20 विश्वचषकात त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या 68 धावा आहे.
मेलबर्नच्या मैदानावर सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी केली. झिम्बाब्वेविरुद्धची त्याची खेळी अप्रतिम होती. अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 6 चौकार मारले. सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध ३५ धावा करताच इतिहास रचला. एका वर्षात 1000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: उपांत्य फेरीत ‘या’ संघाची होईल एकमेकांशी लढत; जाणून घ्या संघांच्या कामगिरीबद्दल
- ICC T20 World Cup 2022: झिम्बाब्वेवर भारताचा मोठा विजय, उपांत्य फेरीत असेल ‘यांच्याशी’ मुकाबला