ICC T20 Ranking : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या T20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकी खेळी केल्यामुळे ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) बक्षीस मिळाले आहे. ऋतुराजने 143 स्थानांची झेप घेतली आहे. त्याचवेळी मालिकेतील दोन सामन्यांमध्ये 4 विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहनेही कमाल केली आहे. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईलाही याचा मोठा फायदा झाला आहे.
आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 (ICC T20 Ranking) सामन्यात ऋतुराज गायकवाडने जबरदस्त फलंदाजी केली. शानदार फलंदाजी करत 43 चेंडूत 58 धावा केल्या. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत या शानदार खेळीचे बक्षीस ऋतुराजला मिळाले आहे. ऋतुराज आता या फॉरमॅटमधील पहिल्या 100 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. ऋतुराज 87 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयर्लंड मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी (ICC T20 Ranking) सांभाळणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ताज्या आयसीसी क्रमवारीतही कमालीची प्रगती केली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहने सात स्थानांनी प्रगती केली असून तो 84 व्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी आपल्या फिरत्या चेंडूंनी फलंदाजांना आव्हान निर्माण करणाऱ्या रवी बिश्नोईलाही (Ravi Bishnoi) याचा मोठा फायदा झाला असून त्याने 17 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. बिश्नोई आता 65 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
शुभमन गिललाही फायदा
टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill), जो सध्या फॉर्मात नाही. त्याने एकदिवसीय क्रमवारीतही (ICC T20 Ranking) स्थान मिळवले आहे. गिल आता 50 ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये जगातील चौथा सर्वोत्तम फलंदाज बनला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव हा जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे.