ICC ODI Ranking: नुकतंच ICC ने अपडेट ODI रँकिंग जाहीर केली आहे. ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाला धक्का लागला आहे.
ICC ने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान संघाने भारतीय संघाला मागे टाकत आयसीसी ओडीआय रँकिंग मध्ये दुसरा स्थान प्राप्त केला आहे. हे जाणुन घ्या की ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.
पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने मानांकनाच्या वार्षिक अपडेटेडनंतर त्यांच्या रेटिंगमध्ये पाच गुणांनी सुधारणा केली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे आता 118 रेटिंग गुण झाले आहेत. दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ 116 रेटिंग गुणांसह दुसऱ्या तर भारत 115 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
ICC प्रकाशनात म्हटले आहे की, ‘वार्षिक अपडेटपूर्वी ऑस्ट्रेलिया 113 गुणांसह अव्वल होता आणि दशांश फरकाने भारत दुसऱ्या स्थानावर होता. पाकिस्तान 112 गुणांसह तिसर्या स्थानावर होता, पण न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना जिंकून त्यांनी काही काळ अव्वल स्थान गाठले.
पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा एकदिवसीय सामना जिंकला असता तर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिले असते, पण न्यूझीलंडने त्यांना हा सामना जिंकून गुणतालिकेत स्वीप करण्यापासून रोखले. मे 2020 पासून पूर्ण झालेल्या सर्व एकदिवसीय मालिका ICC वार्षिक क्रमवारीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये मे 2022 पूर्वी पूर्ण झालेल्या मालिकांसाठी 50 टक्के गुण देण्यात आले आहेत, तर त्यानंतरच्या सर्व मालिकांना 100 टक्के गुण देण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव
आयसीसीने म्हटले आहे की, “याचा अर्थ असा आहे की इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा 0-4 असा पराभव या क्रमवारीतून काढून टाकण्यात आला आहे, तर 2021 मध्ये त्याच संघाविरुद्ध 0-3 असा पराभव 50 टक्के रेटिंग गुणांसाठी मोजला जाईल.” या क्रमवारीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-2 अशा पराभवाचा फटका सहन करावा लागला. या क्रमवारीत न्यूझीलंड (104) चौथ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड 10 रेटिंग गुणांच्या नुकसानासह पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 101 रेटिंग गुण आहेत.
भारत कसोटी आणि टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम
ICC T20 आणि कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. कसोटी क्रमवारीत भारताचे 121 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियन संघ 116 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाचे T20 रँकिंगमध्ये 267 रेटिंग पॉईंट्स आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडचे 259 रेटिंग पॉइंट आहेत.