ICC Changes New Rule : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसीने स्लो ओव्हर रेटच्या नियमांमध्ये (ICC Changes New Rule) मोठा बदल केला आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी दिलासादायक बाब आहे की आयसीसीने असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या खिशातून जास्त पैसे जाणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे आयसीसीच्या वार्षिक परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये संथ ओव्हर टाइमसाठी आकारण्यात येणारा दंड कमी करण्यात आला आहे.
ICC ने स्लो ओव्हर रेटच्या नियमात मोठा बदल केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर रेटच्या शिक्षेत बदल करण्यात आला आहे, याची माहिती आयसीसीने दिली आहे. स्लो ओव्हररेटमुळे, संघांच्या खात्यातून वजा केलेल्या गुणांमध्ये कोणताही बदल झाला नाही, परंतु खेळाडूंच्या फीमध्ये कपात करण्याच्या नियमांमध्ये बदल झाला.
नवीन नियमानुसार, स्लो ओव्हर रेटसाठी प्रत्येक खेळाडूची मॅच फी 10% नाही तर 5% कापली जाईल. अलीकडेच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी 100 टक्के फी कपात करण्यात आली होती, परंतु आता ती फक्त 50 टक्के असेल.
पुरूष आणि महिला संघांची बक्षीस रक्कम समान
2023 च्या विश्वचषकापूर्वी ICC ने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याची घोषणा करताना आयसीसीने सांगितले की, आता महिला संघांना पुरुषांच्या संघांच्या बरोबरीने बक्षीस रक्कम दिली जाईल. 13 जुलै रोजी डर्बन येथे आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ ICC स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी स्पर्धा जिंकल्यास दोघांना समान बक्षीस रक्कम मिळेल.