T20 World Cup 2022 : T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ही मेगा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने (ICC) स्पर्धेची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकासाठी एकूण $5.6 दशलक्ष बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.67 कोटी आहे. यामध्ये, विजेत्याला सर्वाधिक $1.6 मिलियन म्हणजेच सुमारे 13 कोटी मिळतील, तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला सुमारे 6.5 कोटी मिळतील.

ICC ने जाहीर केले आहे, की 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 च्या विजेत्या संघाला $1.6 दशलक्ष बक्षीस रक्कम दिली जाईल, तर उपविजेत्या संघाला अर्धी रक्कम दिली जाईल. 16 संघांमधील एक महिना चालणाऱ्या स्पर्धेच्या शेवटी, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघासाठी $ 4 लाखांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, सुपर 12 मधून बाहेर पडलेल्या 8 संघांमधील प्रत्येक संघाला 7 हजार अमेरिकन डॉलर्स दिले जातील.

T20 विश्वचषक 2022 बक्षीस रकमेची यादी

विजेता – $1.6 दशलक्ष (अंदाजे रु. 13 कोटी)

उपविजेता – $0.8 दशलक्ष (अंदाजे 6.5 कोटी)

उपांत्य फेरीत पराभवी संघ – $0.4 दशलक्ष (सुमारे 3.26 कोटी रुपये)

सुपर 12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला – 40 हजार डॉलर (सुमारे 33.62 लाख रुपये)

सुपर 12 मधून बाहेर पडलेल्या प्रत्येक संघाला – 70 हजार डॉलर (सुमारे 57.09 लाख)

पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 40 हजार डॉलर (सुमारे 33.62 लाख रुपये)

पहिल्या फेरीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक संघासाठी – 40 हजार डॉलर (सुमारे 33.62 लाख रुपये)

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 क्रिकेट स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या फेरीत वेस्ट इंडिज, श्रीलंकेसह एकूण 8 संघ भाग घेणार आहेत. यापैकी 4 संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील. टीम इंडिया (Team India) 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

Share.

Leave A Reply

Exit mobile version