Hyundai Creta EV : खरेदीदारांनो, जरा थांबा! लवकरच लाँच होणार शानदार EV कार; मिळेल 450 किमी रेंज

Hyundai Creta EV : जर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर जरा थांबा. कारण बाजारात लवकरच Hyundai सह इतर कंपन्या आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. ज्यात तुम्हाला 450 किमी रेंज मिळेल.

रेंज

Hyundai Creta Electric ला 45kWh चा बॅटरी पॅक मिळेल जो पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 450 किलोमीटर इतका चालेल. इतकेच नाही तर इलेक्ट्रिक क्रेटाला 138hp पॉवर आणि 255 Nm टॉर्क देण्यात येईल. रेंजच्या दृष्टीने इलेक्ट्रिक क्रेटा हा एक चांगला पर्याय ठरेल.

मिळतील प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये

Hyundai नवीन इलेक्ट्रिक Creta मध्ये लेव्हल 2 ADAS, वायरलेस चार्जिंग पॅड, 10.25 इंच टच स्क्रीन सिस्टम, 8 स्पीकर साउंड सिस्टम, डॅशकॅम, 360 डिग्री कॅमेरा, Apple कार प्ले अँड्रॉइड ऑटो,क्लायमेट कंट्रोल, टाइप सी चार्जिंग पोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. हवेशीर जागा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स, सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS यासह अनेक वैशिष्ट्ये यात आहेत.

बूट स्पेस

क्रेटा ईव्ही फक्त सध्याच्या क्रेटावर तयार केली जाईल. Creta EV ची लांबी 4330mm, रुंदी 1790mm, उंची 1635mm, wheelbase 2610mm आहे आणि याला फक्त 433 ची बूट स्पेस मिळेल. इतकेच नाही तर 17 इंच टायर त्यात समाविष्ट केले जाऊ शकतात.

‘या’ कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार होणार लॉन्च

Hyundai Creta EV सोबत, Maruti Suzuki आणि Tata Motors च्या नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लॉन्च करण्यात येतील. किमतीचा विचार केला तर कारची किंमत सुमारे 20-25 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. XUV400 सर्वात स्वस्त मध्यम आकाराची EV राहील. किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 15.49 लाख ते 17.49 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, तर MG ZS EV ची किंमत 18.98 लाख ते 24.98 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

Leave a Comment