Hyundai Creta । तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा ‘ही’ कार, दमदार मायलेजसह मिळेल 433 लीटर बूट स्पेस

Hyundai Creta । तुम्ही आता 5 सीटर कार तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. कंपनीची ही दमदार कामगिरी करणारी कार असून ती आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. यात दमदार मायलेजसह 433 लीटर बूट स्पेस मिळेल.

Hyundai च्या Creta मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असून कार CNG मध्ये उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. ही एक जास्त मायलेज देणारी कार आहे. कारमध्ये जास्तीत जास्त 1497 cc इंजिन पॉवरट्रेन आहे. ही कार रस्त्यावर 20.7 kmpl पर्यंत मायलेज देईल. या मस्त कारमध्ये 8-वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी प्रगत फीचर्स दिली आहेत.

या स्मार्ट कारमध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स दिली आहेत. यात हिल होल्ड असिस्ट सिस्टीम दिली आहे, ही सिस्टीम गाडीला उतारावर मागे सरकण्यापासून रोखते. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये कारला 3 स्टार रेटिंग मिळाले असून कार Advanced Driver Assistance System (ADAS) सह येते, ही प्रणाली सेन्सर्सवर चालते, जी अपघात टाळण्यासाठी अलर्ट जारी करते. किमतीचा विचार केला तर ही कार एक्स-शोरूम 10.89 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत ऑफर केली जाते. कंपनीची ही शानदार कार बाजारात Kia Seltos, Maruti Grand Vitara आणि Volkswagen Taigun यांच्याशी टक्कर देते. यात वायरलेस मोबाईल कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे.

Hyundai Creta फीचर्स

LED हेडलाइट आणि मागील सीटवर चाइल्ड अँकरेज मिळेल.
हाय स्पीडसाठी कार 115 PS ची पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करेल.
यात 10.25-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली असून कारच्या मागील पार्किंग सेन्सर आणि 360 डिग्री कॅमेरा असेल.
कारवर चालणारी ड्रायव्हर सीट आणि अलॉय व्हील्स मिळतील.

Leave a Comment