Human Development Index : भारतीयांची कमाई घटली की वाढली? पहा, अहवाल काय सांगतो..

Human Development Index : संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांकामध्ये 193 देशांच्या यादीत (Human Development Index) भारताचा नंबर 134 वा आहे. 2022 साठी जाहीर करण्यात आलेल्या या क्रमवारीत भारताची स्थिती काहीशी सुधारलेली दिसत आहे. मानवी जीवनातील विकासाशी निगडीत विविध गोष्टींचा अभ्यास करून ही यादी तयार केली जाते. या अहवालाच्या मते भारतातील दरडोई उत्पन्नातही सुधारणा झाली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये मानव विकास निर्देशांकमध्ये भारताची स्थिती सुधारली आहे यावेळी भारताने (India) थोडी प्रगती केल्याचे दिसून येत आहे या यादीत भारताचा क्रमांक 134 वा आहे तर 2021 मध्ये भारत 193 देशांमध्ये 135 व्या क्रमांकावर होता.

Physical Activity and Obesity : बापरे! भारतात वेगात वाढतोय ‘लठ्ठपणा’ WHO ने नेमकं उत्तर दिलं

Human Development Index

या अहवालानुसार भारतात (HDI in India) शिक्षण आणि आयुर्मानात मोठी सुधारणा झाली आहे अहवालानुसार भारतीय व्यक्तीचे आयुर्मान 67.2 वर्षांवरून 67.7 वर्षांपर्यंत वाढले आहे देशातील शालेय शिक्षणातही सुधारणा झाली आहे आता भारतात 12.6 वर्षे शाळेत शिक्षण घेतले जात आहे. देशातील नागरिकांची सरासरी कमाई सुद्धा वाढली आहे या अहवालानुसार दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (Per Capita Income) 6 हजार 542 वरून 6 हजार 951 डॉलर पर्यंत वाढले आहे. जे भारतीय चलनात अंदाजे 5.75 लाख रुपये आहे.

एकूणच संयुक्त राष्ट्रांनी मानव विकासावर जारी केलेल्या अहवालानुसार भारत जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे विशेषतः महिला आणि पुरुषांमधील असमानता दूर होताना दिसत आहे. देशात रोजगाराच्या बाबतीत महिला आणि पुरुषांमधील अंतर कमी होताना दिसत आहे. सरकारच्या मते महिलांची भागीदारी 28.3% आहे तर पुरुषांची भागीदारी 76.1% आहे.

India Maldives Tension : मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी पण, कर्मचाऱ्यांची एन्ट्री! पहा, प्लॅन काय?

Leave a Comment