Ola Electric : ओलाची S1 सीरीजने सर्वात जास्त विक्री केली आहे. पण आता तुम्ही ओलाच्या S1 सीरीजवर हजारो रुपयांची सवलत मिळवू शकता. या सीरिजमध्ये कंपनीने भन्नाट फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत.
जाणून घ्या सवलत
सवलतीचा विचार केला तर Ola Electric RUSH चा भाग म्हणून, S1 कंपनी लोकप्रिय S1 Air आणि फ्लॅगशिप S1 Pro इलेक्ट्रिक मॉडेल्सवर रु. 5,000 पर्यंतचे अतिरिक्त आर्थिक लाभ आणि रु. 2,999 किमतीचे मोफत Ola Care+ ऑफर करत आहे.
अलीकडे जोडलेल्या Ola S1 चे वितरण हे तीन बॅटरी पर्यायांमध्ये विकण्यात येत आहे. किमतीचा विचार केला तर त्याची किंमत 2 kWh वेरिएंटसाठी 74,999 रुपये ते टॉप-स्पेक मॉडेलसाठी (एक्स-शोरूम) 99,999 रुपये आहे. इतकेच नाही तर कंपनीने S1 Pro च्या किमतीतही बदल केले आहेत.
जाणून घ्या किंमत
किमतीबद्दल बोलायचे झाले तर नवीन जनरेशन Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये इतकी आहे, तर S1 Air ची किंमत 1,04,999 रुपये आणि S1 X+ ची किंमत 89,999 रुपये इतकी आहे (सर्व किंमती, एक्स-शोरूम). Ola S1 श्रेणीचे ग्राहक 4,999 रुपयांमध्ये एक लाख किलोमीटरपर्यंत आणि 12,999 रुपयांमध्ये 1.25 लाख किलोमीटरपर्यंत वॉरंटी वाढवणे निवडू शकतात. इतकेच नाही तर ओला इलेक्ट्रिक 3KW फास्ट चार्जर ऍक्सेसरी म्हणून विकते, जे 29,999 रुपयांना खरेदी करता येते.
विक्री
विक्रीबद्दल बोलायचे झाले तर Ola ने मे 2024 मध्ये 49 टक्के बाजारपेठेचा वाटा गाठला आहे. ज्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी विक्री चार्टच्या शीर्षस्थानी त्याचे स्थान मजबूत झाले. वाहन पोर्टलनुसार, ब्रँडने महिन्याभरात 37,191 युनिट्सची देशांतर्गत विक्री नोंदवली असून जी त्याच्या S1 स्कूटर श्रेणीच्या यशामुळे चालते.