Car Care Tips | उन्हाचा चटका देईल कारला झटका; उन्हाळ्यात ‘या’ पद्धतीने घ्या वाहनांची काळजी

How To Protect Car From Summer Heat : उन्हाळ्याच्या दिवसांत कडाक्याच्या उन्हापासून (How To Protect Car From Summer Heat) बचाव करणे कठीण होते. वाहने देखील या काळात खराब होण्याची जास्त (Car Care Tips) शक्यता असते. या ऋतूत वाहने पार्क करण्यासाठी सावलीची चांगली जागा मिळणे आवश्यक असेल परंतु जागा नसेल तर बऱ्याचदा वाहने उन्हातच पार्क करावी लागतात. सोयीस्कर पार्किंगसाठी अनेक लोक मोकळ्या जागेत वाहने पार्क करतात. परंतु असे केल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. कडाक्याचा सूर्यप्रकाश तुमच्या वाहनांसाठी अतिशय नुकसानदायक आहे. ज्यामुळे कारच्या बाह्य आणि आतील भागाचे तसेच अन्य स्पेअर पार्ट्सचे नुकसान होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सूर्यप्रकाशामुळे कारच्या नुकसानीबद्दल माहिती देणार आहोत.

कारच्या पेंटचे नुकसान

तीव्र सूर्यप्रकाश कारचा रंग फिका करू शकतो. त्यामुळे कारच्या पेंटमध्ये क्रॅक होऊ शकतात आणि चमक कमी होण्याची शक्यता असते. लाल, काळा आणि गडद रंगाच्या वाहनांना सूर्यप्रकाशामुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.

प्लास्टिक आणि रबरचे नुकसान

सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिक आणि रबरचे काही भाग जसे की टायर, डॅशबोर्ड, विंडो सील खराब होण्याची शक्यता असते. उन्हाच्या कडाक्यामुळे यामध्ये तडे जाण्याची शक्यता राहते.

Mahindra New Car : कमी किमतीत घरी आणा जबरदस्त मायलेज देणारी Mahindra ची ही कार, पहा फीचर्स

Car Care Tips

इंजिनवर दबाव

उन्हाळ्यात कारचे तापमान वाढते अशा परिस्थितीत कारमधील एसीला केबिन थंड करण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे कारच्या इंजिनवर दबाव देखील वाढतो.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे

सूर्यप्रकाशामुळे कारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. वाहनातील एअर कंडिशन, रेडिओ, पॉवर विंडो या उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

बॅटरीवर परिणाम

उष्णतेमुळे वाहनांच्या बॅटरीची क्षमता कमी होते आणि बॅटरीचे आयुष्यमान देखील कमी होते. काही प्रकरणांमध्ये बॅटरी पूर्णपणे खराब देखील होऊ शकते. त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात सावलीत वाहने पार्क करा.

Tata cars : 10 लाखांच्या बजेटमध्ये सर्वोत्तम आहे टाटाची ‘ही’ कार, मिळतील जबरदस्त फीचर्स

Car Care Tips

कार कव्हर करा

उन्हाळ्याच्या दिवसात चांगल्या दर्जाचे कार कव्हर पेंट प्लास्टिक आणि रबरचे उष्णतेपासून संरक्षण करते. त्यामुळे वाहने पार्क केल्यानंतर त्यावर कव्हर टाकण्यास विसरू नका. या पद्धतीने तुम्ही काळजी घेतल्यास उन्हाळ्याच्या दिवसात वाहने सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.

कार थंड ठेवा

जर तुम्हाला कार मध्ये एसी चालू करायचा नसेल तर कारच्या खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून हवा आत येऊ शकेल आणि यामुळे कारमधील वातावरण देखील थंड राहण्यास मदत मिळेल.

नियमित देखभाल

उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही तुमच्या वाहनांची नियमित देखभाल दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहनातील बॅटरी, टायर, इंजिन ऑइल या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाहनांची सर्विसिंग वेळच्या वेळी करणे देखील महत्त्वाचे आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही या गोष्टी वेळच्या वेळी लक्ष देऊन केल्या नाही तर भविष्यात वाहनांच्या मेंटेनन्सवर तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यासोबतच तुमचा मनस्तापदेखील वाढेल.

Leave a Comment