Maharashtra Politics । महायुतीचा मोठा डाव! निवडणूक जिंकण्यासाठी घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Politics । राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने मोठा डाव टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

विधान परिषदेआधी आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी सर्वच पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अजूनही हॉटेल सापडले नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये थांबणार आहेत, तर भाजपचे आमदार हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये थांबणार आहेत. आपल्या आमदारांसाठी एकनाथ शिंदे यांनी ६० रूम्स बुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील महत्त्वाच्या हॉटेल्सच्या सर्व रुम्स बुक झाल्या आहेत, याच कारणामुळे अजित पवार गटाला हॉटेल सापडले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाकडून फोर सिझन्स किंवा ललीत हॉटेलची चाचपणी सुरू झाली असून यातील एका हॉटेलमध्ये अजित पवार गटाचे आमदार थांबण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा आज दुपारपर्यंत होईल. दरम्यान, महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात असून एकूण ११ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. याच कारणामुळे निवडणुकीदरम्यान क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोन्हीकडून मतांची जुळवा जुळवा करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे एक मोठा आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर असेल. त्यामुळे आता मतांची जुळवाजवळ नेमकी कशी ? कोणाला किती मतं मिळणार? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

Leave a Comment