Hormonal Imbalance : ‘या’ औषधी वनस्पतींपासून नियंत्रणात येईल हार्मोनल असंतुलन, कसे ते जाणून घ्या

Hormonal Imbalance : अनेकजण हार्मोनल असंतुलनाने त्रस्त असतात. शरीरातील हार्मोनल असंतुलन एखाद्याला अनेक समस्यांना बळी पाडतात. पण तुम्ही काही औषधी वनस्पतींपासून लवकर आराम मिळवू शकता.

या सर्व समस्या महिलांच्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम असल्याने अनेक स्त्रिया औषधांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. औषधांव्यतिरिक्त, आयुर्वेदिक पद्धतींद्वारे हार्मोनल असंतुलन नियंत्रित करता येते.

या नैसर्गिक उपायांमुळे तुम्हाला या सर्व समस्यांपासून आराम मिळतो. काही औषधी वनस्पतींमुळे महिलांमधील हार्मोनल असंतुलन नियंत्रणात येऊ शकते. विशेष म्हणजे अनेकांना या वनस्पती माहिती नसतात. जाणून घेउयात या वनस्पतींबद्दल.

अश्वगंधा

अश्वगंधा अनेक उपचारांमध्ये दीर्घकाळापासून वापरली जात असून रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. ते पावडर किंवा चहाच्या स्वरूपात बाजारात सहज उपलब्ध असून ते तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप देण्यास मदत करते. हे लक्षात घ्या की अश्वगंधा इन्सुलिनची पातळी आणि पुनरुत्पादक हार्मोन्स नियंत्रित करण्यास सक्षम आहे.

चेस्टरबरी

ही औषधी वनस्पती कॅप्सूल किंवा अर्क स्वरूपात बाजारात उपलब्ध असून महिलांना येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच त्यांच्यामध्ये होणाऱ्या प्रजनन आरोग्याच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. हे रजोनिवृत्तीची लक्षणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

शतावरी

स्त्रियांमध्ये पुनरुत्पादक समस्यांसाठी हे सर्वात जास्त वापरले जात असून हे इस्ट्रोजेन पातळी राखण्यास मदत करते. हे केवळ प्रजनन समस्या सुधारत नाही तर त्यांचे मासिक चक्र सुधारले जाते.

Leave a Comment