Honda Unicorn : होंडाच्या सर्व बाईक हाय स्पीड आणि मायलेज जनरेट करतात. युनिकॉर्न ही कंपनीची उच्च पॉवर बाईक असून यात अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. होंडाच्या या दमदार बाईक मध्ये 160cc इंजिन मिळेल.
नवीन युनिकॉर्नमध्ये 13 लीटरची मोठी इंधन टाकी देण्यात आली आहे, नवीन बाईकमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे, ही प्रणाली बाईकच्या मागील टायरला सेन्सरद्वारे जोडण्यात आली आहे. यामुळे ब्रेक लागल्यास बाइकवर नियंत्रण ठेवण्यासाठी रायडरला जास्त वेळ मिळतो. दुचाकी घसरण्यापासून रोखण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
मिळेल एक प्रकार आणि तीन रंग पर्याय
किमतीचा विचार केला तर ही Honda बाईक 1.09 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. या बाईकमध्ये हाय पॉवर 162.7cc इंजिन दिले आहे, हे इंजिन रस्त्यावर 12.73 bhp पॉवर आणि 14 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात एक प्रकार आणि तीन रंगांचे पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
मिळेल सिंगल-पॉड हॅलोजन हेडलाइट
बाईकचे एकूण वजन 140 किलो इतके असून त्यामुळे तिचे काउंटर वेट बॅलन्स खूप चांगले आहे, त्यामुळे ती रस्त्यावर जास्त वेगाने कंपन करत नाही. बाइकमध्ये सिंगल-पॉड हॅलोजन हेडलाइट दिली असून यात रुंद आणि ट्यूबलेस टायर दिले आहेत.
होंडा युनिकॉर्न स्मार्ट फीचर्स
- बाइकमध्ये मोठा हेडलाइट आणि साधा हँडलबार मिळेल.
- बाईकच्या सीटची उंची 798 मिमी इतकी आहे.
- बाइकचा ग्राउंड क्लीयरन्स 8 मिमी इतकी आहे.
- समोर क्रोम गार्निश करण्यात आले आहे.
- कंपनीचा दावा आहे की याला 50 kmpl पर्यंत मायलेज मिळते.
- होंडाच्या या बाईकमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.
- समोर टेलीस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे.
- बाइकच्या मागील टायरवर ड्रम ब्रेक उपलब्ध करून दिले आहेत.