Honda Stylo : Honda लाँच करणार 160cc इंजिनसह Stylo, जाणून घ्या फीचर्स

Honda Stylo : जर तुम्हाला नवीन स्कुटर खरेदी करायची असेल तर जरा थांबा. कारण भारतीय बाजारात लवकरच Honda 160cc इंजिनसह Stylo लाँच करणार आहे. यात 15.4 पीएस पॉवर आणि 13.8 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो.

मिळेल 160 सीसी इंजिन

रिपोर्ट्सनुसार, Honda Motorcycle and Scooter India ने भारतात नवीन स्कूटरचे पेटंट घेतले आहे. माहितीनुसार, ही स्कूटर 160 सीसी इंजिनसह येऊ शकते आणि तिचे नाव स्टायलो असे असेल. सध्या, हे कंपनीने फक्त एकाच देशात ऑफर केली असून लवकरच ती भारतीय बाजारपेठेत देखील आणले जाऊ शकते.

असे असेल डिझाइन

कंपनीने तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून त्याची रचना केली असून स्कुटरमध्ये ओव्हल शेप हेडलाइट,एलईडी लाइट्स, सिंगल सीट, डिजिटल कन्सोल, की-लेस, यूएसबी चार्जर, टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, सिंगल चॅनल एबीएस आणि सीबीएस यांसारख्या फीचरसह ऑफर केली आहे.

15.4 पीएस पॉवर आणि 13.8 न्यूटन मीटर टॉर्क

नवीन स्कुटरमध्ये Honda कडून 156.9 सीसी इंजिन देण्यात आले आहे. ज्यासोबत PGM-FI तंत्रज्ञान देखील दिले जात असून या इंजिनमधून स्कूटरला 15.4 पीएस पॉवर आणि 13.8 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात चांगल्या सरासरीसाठी पाच लिटरची पेट्रोल टाकी आणि निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप सिस्टम देखील मिळते. शक्तिशाली 160 सीसी इंजिनसह, स्कूटर एक लिटर पेट्रोलवर सुमारे 45 किलोमीटर चालेल.

किती असेल किंमत?

किमतीचा विचार केला तर इंडोनेशियामध्ये या स्कूटरची किंमत 1.45 लाख रुपयांपासून सुरू होते. तर कंपनीने 1.65 लाख रुपयांना त्याचा टॉप व्हेरिएंट ऑफर केला आहे. अशा वेळी भारतीय बाजारात लॉन्चच्या वेळी या स्कूटरची संभाव्य किंमत सुमारे 1.50 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment