Honda scooters : Honda ची शानदार फॅमिली स्कूटर, 47 Kmpl मायलेजसह किंमत आहे फक्त…

Honda scooters : जर तुम्हाला कमी किमतीत फॅमिली स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता Honda ची ही शानदार स्कुटर खरेदी करू शकता. यात 5.3 लीटरची इंधन टाकी तसेच मायलेज 47 Kmpl मिळेल.

मिळेल उच्च पॉवर इंजिन

किमतीबद्दल बोलायचे झाले तर Honda Activa 6G ची सुरुवातीच्या किंमती 76234 रुपये एक्स-शोरूममध्ये दिली जात आहे. यात 109.51 cc चे हाय पॉवर इंजिन असून या कंपनीचा असा दावा आहे की स्कूटरला 47 kmpl चा मायलेज देईल. तर या स्कूटरचे वजन 106 किलो इतके आहे, ज्यामुळे महिला आणि वृद्ध लोक स्कुटर सहज चालवू शकतात. ही एक मोठ्या आकाराची फॅमिली स्कूटर असून या स्कुटरच्या टायरचे आकार रुंद आहेत.

मिळेल 5.3 लिटरची इंधन टाकी

कंपनीच्या नवीन Honda Activa 6G ची इंधन टाकी 5.3 लीटर आहे. तर ही स्कूटर 7.73 bhp ची कमाल पॉवर आणि 8.90 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. ही स्कूटर रस्त्यावर 85 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देईल. तर या स्कूटरचे एच-स्मार्ट टॉप मॉडेल 96984 रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

मिळतील 5 प्रकार आणि 9 रंग पर्याय

Honda च्या या स्कूटरमध्ये पाच प्रकार आणि 9 रंग पर्याय मिळतील. तसेच यात समोरच्या टायरवर डिस्क ब्रेक आणि मागील टायरवर ड्रम ब्रेक आहे. स्कूटर एलईडी लाइट आणि साध्या हँडलबारसह येत असून या स्कूटरमध्ये डिजिटल कन्सोल आणि रुंद सीट आकारमान आहे.

स्कूटरच्या पुढच्या बाजूला 12 इंच टायर आणि मागील सीटवर 10 इंच टायर आहे. बाजारात Honda ची स्कुटर Suzuki Access 125, TVS Jupiter, Yamaha Fascino 125 आणि Hero Xoom सारख्या स्कूटरला जोरदार टक्कर देते.

Leave a Comment