Honda Cars Discount : होंडाची ग्राहकांसाठी खास ऑफर, ‘या’ कारवर मिळणार 1 लाखापेक्षा जास्त सवलत, त्वरा करा

Honda Cars Discount : भारतीय बाजारात Honda च्या कार्सना चांगली मागणी असते. मागणी जास्त असल्याने कंपनी सतत दमदार फीचर्स आणि मायलेज असणाऱ्या कार लाँच करत असते. तुम्ही आता कंपनीच्या कारवर लाखो रुपयांची सवलत मिळवू शकता.

Honda City वर मिळेल ऑफर

होंडा सिटीच्या पाचव्या पिढीच्या मॉडेलवर 1,14,500 रुपयांचे फायदे देण्यात येत असून या कारच्या ZX व्हेरिएंटवर 25 हजार रुपयांची सवलत किंवा ॲक्सेसरीजवर 26,947 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. या कारवर 25 हजार रुपयांची कार एक्स्चेंज डिस्काउंट मिळेल.

कंपनी 20 हजार रुपयांची रोख सवलत देत आहे किंवा ॲक्सेसरीजवर 21,396 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. या कारवर 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. Honda City ची एक्स-शोरूम किंमत 12,08,100 रुपयांपासून सुरू होते.

होंडा सिटीच्या एलिगंट एडिशनवर 36,500 रुपयांचे फायदे देण्यात येत आहेत. या मॉडेलवर 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत मिळेल. होंडा या कारवर 20 हजार रुपयांची विशेष सवलत देखील मिळेल.

Honda Amaze ऑफर

तुम्ही Honda Amaze खरेदी करण्याच्या विचारात असल्यास तुम्हाला या कारवर 96 हजार रुपयांचे फायदे मिळतील. या कारवर 10 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट मिळेल. त्याच्या एंट्री लेव्हल मॉडेलवर 12,349 रुपयांच्या मोफत ॲक्सेसरीज दिल्या जात आहेत. Honda Amaze वर 20 हजार रुपयांची रोख सूट आणि 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. त्याच्या इतर प्रकारांवर 4 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस उपलब्ध आहे.

Honda Amaze च्या Elite Edition मॉडेलवर 30 हजार रुपयांची सवलत मिळेल. या कारवर 24,346 रुपयांच्या मोफत ॲक्सेसरीजचाही पर्याय आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 7,92,800 रुपयांपासून सुरू होईल.

Honda Elevate वर मिळेल सवलत

होंडा एलिव्हेटवर 55 हजार रुपयांचे फायदे देण्यात येत आहेत. Honda Elevate वर या सवलतीच्या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बोनस आणि लॉयल्टी बोनसचा समावेश करण्यात आला आहे. कारमध्ये 1498 cc इंजिन, 16.92 kmpl चे मायलेज मिळेल. कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स किंवा 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. मे 2024 मध्ये नवीन फायदे उपलब्ध झाल्यानंतर, या कारची एक्स-शोरूम किंमत 11.91 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.

Leave a Comment