Home Made Pack For Wrinkles : आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे सहज शक्य (Home Made Pack For Wrinkles) होत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. या कारणामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणेही दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे कुणालाच आवडत नाही. या सुरकुत्या घालवून चेहरा तजेलदार करण्यासाठी मग हजारो उपाय केले जातात. त्यासाठी तितकेच पैसेही खर्च केले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांची माहिती देणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्या निश्चित कमी करू शकता.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी (Skin Care Tips) तुम्ही घरातच असलेल्या काही पदार्थांचा वापर करू शकता. यासाठी तुमच्याकडे दोन चमचे मध, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा दही, एक चमचा बेसन, एक चमचा ऑलिव्ह ऑईल पाहिजे.
Skin care tips । वयाच्या तिशीनंतर रोज प्या ‘हा’; खास चहा, चेहरा राहील चमकदार आणि तरुण
Home Made Pack For Wrinkles
अशा पद्धतीने तयार करा पेस्ट
सर्वात आधी एका वाटीत मध, लिंबाचा रस, दही, बेसन आणि ऑलिव्ह ऑईल मिसळून घ्या. आता या पेस्टला चेहऱ्यावरील सुरकुत्यावर लावा. पेस्ट लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. पेस्ट कोरडी झाल्यानंतर कोमट पाण्यासह हलक्या हातांनी मसाज करा. यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोन वेळेस तुम्ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यानंतर तुमच्या चेहऱ्यात मोठा बदल झालेला तुम्हाला दिसेल. चेहऱ्याची त्वचा अधिक चमकदार दिसेल आणि सुरकुत्या सुद्धा कमी झालेल्या दिसतील.
प्रत्येकजण चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या मेकअपने (Makeup tips) लपवण्याचा प्रयत्न करतात. तरूण रहायला, दिसायला सगळ्यांना आवडत असते. यासाठी योगा, व्यायाम आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. तुम्हीही घरबसल्या त्वचा तरुण ठेवू शकता. निरोगी आहार ही निरोगी त्वचेची गुरुकिल्ली असून फळे शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करतात.
Home Made Pack For Wrinkles
या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने त्वचा हायड्रेट राहते. ही फळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्वांनी भरलेली असल्याने तुमच्या त्वचेला पोषण देतात. बेरी, संत्री, सफरचंद या फळांचा आहारात समावेश केल्याने चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.
Skin care Tips: त्वचा तरुण ठेवायचीय? तर आहारात करा ‘या’ 3 फळांचा समावेश