Home Loan : शेवटची संधी! देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्वस्तात देतेय गृहकर्ज, लगेचच करा अर्ज

Home Loan : प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असते. तसेच त्या बँकांचे गृहकर्ज दर देखील वेगळे असते. सर्वात कमी व्याजदर असणाऱ्या बँकेला ग्राहक पाठिंबा देतात. अशातच देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्वस्तात गृहकर्ज देत असून त्याचा तुम्हाला उद्यापर्यंत लाभ घेता येईल.

SBI गृहकर्ज व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया ही 31 मार्च 2024 पर्यंत गृहकर्जावर ऑफर देत असून ज्या ग्राहकांचे CIBIL स्कोअर 750-800 पेक्षा जास्त असेल त्यांना 8.60 टक्के व्याज देण्यात येत आहे. ऑफरशिवाय गृहकर्जाचा व्याजदर 9.15 टक्के इतका आहे.

SBI अमृत कलश

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ची अमृत कलश योजना ही एक विशेष मुदत ठेव योजना असून यात गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. म्हणजेच तुम्हाला उद्यापर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. तसेच त्यावर बँक ७.१० टक्के व्याज देत असून ही SBI ची एक खास योजना आहे ज्यात 400 दिवसांच्या FD वर 7.10 टक्के व्याज देण्यात येत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, कोणालाही अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह गुंतवणूक करता येईल. यावर त्याला हमी परतावा देखील मिळेल.

बँकेच्या मतानुसार, अमृत कलश स्कीम FD गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याज पेमेंट घेतील. या एफडीमध्ये जमा केलेले पैसे 400 दिवसांच्या कालावधीपूर्वी काढले तर बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा 0.50 टक्के ते 1 टक्के कमी व्याजदर कपात करते.

SBI Wecare

SBI ने अलीकडेच असे घोषित केले की WeCare FD योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत असून SBI त्यांच्या WeCare FD वर ग्राहकांना सर्वोत्तम व्याज मिळेल. बँक कोणत्याही FD वर सामान्य ग्राहकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 अधिक व्याज देत आहे. SBI Wecare वर 7.50 टक्के व्याज देण्यात येत आहे. योजनेअंतर्गत, किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षांसाठी गुंतवणूक करण्यात येते. हे दर नवीन आणि नूतनीकरणयोग्य एफडीवर उपलब्ध असतात, हे लक्षात ठेवा.

Leave a Comment