Home Loan Rejection : वारंंवार रिजेक्ट होतोय होम लोनचा अर्ज; ‘या’ 5 गोष्टी तर जबाबदार नाहीत?

Home Loan Rejection : घर घेण्यासाठी अनेक लोक गृहकर्जाचा पर्याय (Home Loan Rejection) निवडतात. नोकरदार वर्गासाठी घर घेणे म्हणजे मोठी गोष्ट असते. परंतु त्यांच्याकडे घर खरेदी करण्यासाठी पाहिजे तितके पैसे नसतात. अशावेळी गृहकर्जाचा पर्याय उत्तम मानला जातो. परंतु, अनेक वेळा अर्ज सुद्धा फेटाळला जातो सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतानाही कर्ज मिळत नाही, असे प्रकार अनेकदा घडतात. बँका कर्जाचा अर्ज का नाकारतात आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून कर्जाचा अर्ज नाकारला जाणार नाही याची माहिती घेऊ या..

होम लोनसाठी वय मुख्य घटक

होम लोन देण्यापूर्वी कोणतीही बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता किती आहे याची तपासणी करतात. यामुळेच वित्तीय संस्था जास्त वयाच्या व्यक्तीच्या तुलनेत तरुणांना कर्ज देण्यास प्राधान्य देतात. समजा एखाद्या व्यक्तीचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याचा होम लोन साठीचा अर्ज नाकारला जाण्याची शक्यता खूप जास्त असते.

Personal Loan : सावधान! बँकेकडून लोन घेत आहात? लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Home Loan Rejection

होम लोनचे हप्ते साधारणपणे 15 ते 20 वर्षांसाठीचे असतात. अशा परिस्थितीत जास्त वयाच्या व्यक्ती किती दिवस कर्ज होते देऊ शकेल किंवा बँकेचे कर्ज अडकू शकेल असे बँकेला वाटते. त्यामुळे बऱ्याच वेळा निवृत्तीनंतर अशा लोकांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. यामुळेच बँका तरुणांना कर्ज देण्यास अधिक प्राधान्य देतात. साधारणपणे 30 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना कर्ज देण्याकडे बँकांचा कल जास्त असतो.

कर्जाच्या अर्जातील माहिती

जेव्हाही होम लोनसाठी अर्ज केला जातो त्यावेळी अर्जातील सर्व माहिती अचूक आहे याची खात्री करणे आवश्यक ठरते. गृह कर्जाचा अर्ज भरताना काही चुका केल्यास अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते आणि बँकांकडून त्याचे रेकॉर्डही ठेवले जाते. अशा परिस्थितीत बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. संबंधित व्यक्तीची मिळकत आणि कर्जाची रक्कम यांच्यात बँकेला ताळमेळ दिसत नसेल तर कर्जाचा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता जास्त असते.

Home Loan Rejection

जर एखादा व्यक्ती होम लोनसाठी वारंवार चौकशी करत असेल आणि कर्ज घेत नसेल तर प्रत्यक्षात कर्ज घेण्यासाठी गेल्यावर अशा व्यक्तीचा अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते. खरंतर जेव्हा गृह कर्जासाठी एखादा व्यक्ती अर्ज करतो तेव्हा कर्ज परतफेडीच्या बाबतीत त्या व्यक्तीचा मागील रेकॉर्ड कसा आहे याची तपासणी बँकेकडून केली जाते. वित्तीय संस्था अशा व्यक्तीचा क्रेडिट स्कोर (Credit Score) आधी चेक करतात. अशावेळी जर खरोखरच कर्ज घेण्याची आवश्यकता असेल तेव्हाच कर्ज घेण्यासाठी अर्ज करा.

Loan Default Rules : तुम्हालाही कर्जाची परतफेड करता येत नाही? लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी, होईल फायदा

एका वेळी एकच ठिकाणी अर्ज करा

एकावेळी एका संस्थेकडे होम लोनसाठी अर्ज करणे केव्हाही चांगले जेव्हा बँका किंवा वित्तीय संस्था क्रेडिट स्कोर तपासतात तेव्हा त्यांचे तपशील क्रेडिट अहवालात नोंदवले जातात. एकाच वेळी अनेक बँका किंवा वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी संपर्क साधल्यास याची माहिती बँकांना कळते. यामुळे वित्तीय संस्था संबंधित अर्जदाराबद्दल नकारात्मक मत बनवू शकतात आणि नंतर अर्ज ही नाकारला जाण्याची शक्यता जास्त असते.

Home Loan Rejection

ब्लॅक लिस्टेड प्रकल्प आणि क्रेडिट हिस्ट्री नसणे

अनेक वेळा बँका आणि वित्तीय संस्था काही प्रकल्प अनेक क्षेत्रांना काळ्या यादीत टाकतात. त्यांना वाटते की त्या प्रकल्पांमध्ये कर्ज अडकण्याचा धोका जास्त आहे. कारण त्यांचा ट्रॅक रेकॉड चांगला नाही जर अशा प्रकल्प किंवा क्षेत्रातून होम लोनसाठी अर्ज केला गेला असेल तर तो अर्ज नाकारला जाण्याची पूर्ण शक्यता असते, असे प्रसंग अनेकांच्या बाबतीत घडले आहेत. त्याचवेळी संबंधित अर्जदाराचा कोणताही क्रेडिट इतिहास नसला तरीही त्या अर्जदाराचा अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते अशा स्थितीत कर्ज परतफेडीच्या बाबतीत संबंधित व्यक्तीचा क्रेडिट रेकॉर्ड काय आहे याचा अंदाज बँकेला लावता येत नाही.

Leave a Comment