Home Loan: गृहकर्ज घेऊन तुम्ही देखील घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची योजना आखत असाल मात्र तुम्हाला गृहकर्ज बँकेकडून मिळत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही तुम्हाला या लेखात गृह कर्ज मिळण्यासाठी एक सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्याला फॉलो करून तुम्ही बँकेतून सहज गृह कर्ज घेऊ शकतात.
अनेकवेळा जेव्हा आपण गृहकर्जासाठी अर्ज करतो तेव्हा बँक काही कारण सांगून अर्ज नाकारते. पण तुम्हालाही सहज गृहकर्ज घ्यायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
या पद्धतींचा अवलंब करा
तुम्हाला हे माहित असले पाहिजे की तुम्ही जेव्हाही कर्ज घेता तेव्हा सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर बँकेमार्फत तपासला जातो. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही त्याचे ईएमआय हप्ते वेळोवेळी भरत असाल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहील. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्ही सहज आणि कमी व्याजदरात गृहकर्ज मिळवू शकता.
डाउन पेमेंटची रक्कम
तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, जर तुम्ही 60 लाख रुपयांचे घर खरेदी करत असाल तर तुम्ही किमान 6 ते 12 लाख रुपये देऊ शकता. असे केल्याने तुमच्या कर्जाची रक्कम कमी होते आणि त्यावर आकारले जाणारे व्याजही कमी होते. त्यामुळे अधिक डाउन पेमेंट रक्कम भरून, एकीकडे तुम्ही व्याज म्हणून अतिरिक्त पैसे भरण्यापासून वाचता आणि दुसरीकडे, तुम्हाला कर्ज देखील सहज मिळते. त्यामुळे शक्य तितके पैसे देऊन गृहकर्ज घेऊ शकता.
दीर्घकालीन कर्ज सहज उपलब्ध
तुम्हाला गृहकर्ज घेताना समस्या येत असल्यास, तुम्ही दीर्घकालीन EMI पर्याय निवडू शकता. यामुळे बँकेला अधिक व्याज मिळते आणि ती तुम्हाला सहज कर्ज देऊ शकते.
ग्राहकांनो, होळीपूर्वी खरेदी करा सोने, मिळत आहे खूपच स्वस्त; नवीन दर तपासा
दीर्घ कालावधीचे गृहकर्ज घेतल्यास, तुम्हाला मासिक हप्ता खूपच कमी भरावा लागेल. त्यावर बँकेमार्फत भरघोस व्याजही आकारले जाते. त्यामुळे कर्ज घेताना त्यात प्रीपेमेंटचा पर्याय आहे याचीही खात्री करावी. जेणेकरून हे पैसे नंतर तुमच्याकडे येतील, तुम्ही एकाच वेळी कर्जाची परतफेड करून अतिरिक्त व्याज टाळू शकता.