पुणे (Pune Home loan) : जर तुम्ही घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही महत्वाची माहिती नक्कीच वाचा. कारण अशावेळी तुम्हाला गृहकर्ज घेण्याची गरज असेलच की. अशावेळी जर काही कारणास्तव तुमचा सीबील क्रेडिट स्कोअर (cibil credit score) चांगला नसेल तर कर्ज मिळणे खूपच कठीण होते.
असे असतानाही आपले उत्पन्न जर बँकेचे पात्रता निकष पूर्ण करत असेल आणि याच एका कारणावरून गणित अडकले असेल तर तुमच्यासाठी संयुक्त गृह कर्ज हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. याद्वारे तुम्ही कर्ज घेण्याची क्षमताही वाढवू शकता. मग तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत संयुक्त गृहकर्ज घेऊ शकता. पालक, पती किंवा पत्नी, भाऊ यांच्यासह सहकर्जदार म्हणून अर्ज करू शकता. अशावेळी मालमत्तेत ते सह-मालक असणे आवश्यक नाही.
संयुक्त गृहकर्ज घेत असाल तर तुम्ही बँकांकडून जास्त कर्ज घेऊ शकता. अशावेळी दोन्ही व्यक्ती हे बँकांचे मूलभूत पात्रता निकष यासाठी गृहीत धरलेले असतात. बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेताना खराब क्रेडिट स्कोअर हा सार्वत्रिक मुद्दा झाला आहे. असे कर्ज घेऊन आपण कलम-24 आणि कलम-80C अंतर्गत कर वजावट संयुक्त गृहकर्जाच्या विहित मर्यादेत फायदेही मिळू शकतात. संयुक्त कर्जामध्ये 1.5 ते 2 लाख रुपयांचा कर लाभ आणि आयकर कायद्यानुसार (Income Tax Act) एकूण 7 लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो.
financial products मध्ये प्रत्येकाचे जसे फायदे असतात, तसेच तोटे असतात की. त्याच प्रकारे संयुक्त गृहकर्जाचे देखील फायदे आणि तोटे असतात. जर सह-कर्जदाराने कर्जाचा ईएमआय (bank loan EMI) वेळेवर भरला नाही, तर त्यामुळं दुसऱ्याचा क्रेडिट स्कोअर खराब होतात. यासोबतच सहकर्जदारांमध्ये काही वाद असल्यास त्याचा परिणाम पेमेंटवरही झाला आहे. अशी उदाहरणे आहेत.
Winter Care With Honey: हिवाळ्यात मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी असा करा मधाचा वापर !
Credit card bill payment बाबत समोर आलेय ‘हे’ धक्कादायक वास्तव; पहा युजर नेमके कशात अडकलेत
Car Loan Tips : कार खरेदीसाठी कर्ज घेताय ? ; मग, आधी ‘या’ चार गोष्टींची माहिती घ्या..!