Hingoli Lok Sabha : हिंगोलीत मोठा ट्विस्ट! भाजपाच्या विरोधाचा हेमंत पाटलांना फटका; उमेदवार बदलाच्या हालचाली?

Hingoli Lok Sabha Election : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेने हेमंत पाटील (Hingoli Lok Sabha Election) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांकडून प्रचंड विरोध करण्यात आला. काल घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत भाजप आमदार पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटील यांना (Hemant Patil) उमेदवारी देऊ नका, अशी मागणी केली. त्यांच्या ऐवजी दुसरा कुणीही उमेदवार द्या त्याचा प्रचार करून निवडून आणू असेही भाजप नेते सांगत आहेत. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला वाढता विरोध पाहता मतदारसंघात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे.

खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले असून उमेदवारी करू नका, अशा सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Hingoli Lok Sabha : हिंगोली महायुतीत मिठाचा खडा! शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा विरोध, नेमकं कारण काय?

Hingoli Lok Sabha

राज्यात महायुतीत अनेक ठिकाणी जागांचा तिढा निर्माण (Hingoli Lok Sabha) झाला आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून याबाबत अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात घेतला जाईल, असे महायुतीचे नेते सांगत असले तरी परिस्थिती तशी दिसत नाही. धुसफूस वाढू लागली आहे. स्थानिक पातळीवर नेते आणि कार्यकर्ते उमेदवाराच्या विरोधात असल्याचेही दिसून येत आहे. असाच प्रकार आता मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात घडत आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतही हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला. या बैठकीत आमदार नामदेव ससाणे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार भीमराव केराम आदी उपस्थित होते. या सर्वांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे सांगितले जात आहे.

Hingoli Lok Sabha

वाढता विरोध पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटलांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सांगितल्याची माहिती आहे. परंतु, यातही शिंदेंनी एक खेळी केली आहे. भाजपच्याच नेत्यांनी आता महायुतीचा उमेदवार या मतदार संघातून निवडून आणावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Hingoli Lok Sabha

Madha Lok Sabha : माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला पण, ‘मविआ’त तिढा?, शरद पवारांच्या मनात काय..

दरम्यान, हेमंत पाटील यांना माहिती करून देण्यात आलेली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या ऐवजी आता बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून चाचपणी केली जात आहे राज्यातील मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

2 thoughts on “Hingoli Lok Sabha : हिंगोलीत मोठा ट्विस्ट! भाजपाच्या विरोधाचा हेमंत पाटलांना फटका; उमेदवार बदलाच्या हालचाली?”

Leave a Comment