Hindenburg Research: गेल्या वर्षी अदानी ग्रुपवर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या खुलाशानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. त्यामुळे बाजारात कारोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तर आता पुन्हा एकदा हिंडेनबर्ग रिसर्च भारताला इशारा देत नवीन खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहे.
अमेरिकन शॉर्ट सेलरने शनिवारी X वर एका पोस्टमध्ये हे सूचित केले. शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्गने आपल्या सोशल मीडिया हँडलवर म्हटले आहे की ते लवकरच भारतीय कंपनीशी संबंधित आणखी एक मोठा खुलासा करणार आहे. कंपनीने X 10 ऑगस्ट रोजी एका पोस्टमध्ये लिहिले की भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार आहे.
अदानी ग्रुपचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता
गेल्या वर्षी 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओच्या आधी अदानी ग्रुपशी संबंधित अहवाल प्रकाशित केला होता. हा अहवाल आल्यानंतर, अदानी ग्रुपच्या शेअर्सचे मार्केट कॅप $ 86 बिलियनने घसरले आणि त्यांच्या विदेशी सूचीबद्ध बाँडची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली.
गेल्या वर्षी अदानी ग्रुपबाबतच्या हिंडेनबर्गच्या अहवालानंतर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनीच्या पुढच्या टप्प्यावर लागल्या आहेत.
सेबीचा नवा खुलासा
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने सध्या सुरू असलेल्या अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात नवीन घडामोडी उघड केल्या आहेत, ज्याने यूएस-आधारित शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्च आणि न्यूयॉर्क हेज फंड व्यवस्थापक मार्क किंग्डन यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला आहे.
SEBI च्या म्हणण्यानुसार, हिंडनबर्गने अदानी ग्रुपविषयीच्या अहवालाची एक ॲडव्हान्स प्रत किंग्डनसोबत सार्वजनिक प्रकाशनाच्या सुमारे दोन महिने आधी शेअर केली, ज्यामुळे धोरणात्मक व्यापाराद्वारे महत्त्वपूर्ण नफा कमावला.