Himalaya Accident: डेहराडून (Dehradun): उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) येथील भटवाडी ब्लॉकमध्ये असलेल्या द्रौपदीच्या दांडा-२ पर्वत या शिखरावर हिमस्खलनात (Himalaya Draupadi danda Avalanche) अडकलेल्या १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगने (NEM / Nehru Institute of Mountaineering) एक बुलेटिन जारी करताना सांगितले की, १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये २ प्रशिक्षक आणि १४ प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचे बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे. याशिवाय खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरद्वारे (Helicopter) सुरू असलेली शोधमोहीम थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- Agriculture News: केळी-भाजीपाला पिकाची ‘ही’ घ्या काळजी; लम्पीवरही करा प्रतिबंधक उपाययोजना
- Business Idea : फक्त 15 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय अन् कमवा 1 लाखांहून अधिक रूपये; पटकन करा चेक
- News Maharashtra today: पवारांनी सांगितले ‘ते’ गुपित; पहा खासदार मुलीबाबत नेमके काय म्हटलेय
हवामानाच्या स्थितीनुसार हेलिकॉप्टरद्वारे मृतदेह बाहेर काढण्याचे काम शुक्रवारी सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिखरावर काही दिवसांपूर्वी चढाईसाठी २९ लोकांची तुकडी निघाली होती. यादरम्यान हिमस्खलनामुळे सर्व लोक बेपत्ता झाले. ४ ऑक्टोबर रोजी पहिले ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर ६ ऑक्टोबर रोजी आणखी १२ मृतदेह सापडले आहेत. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून तब्बल १६ हजार फूट उंचीवर होते. १५ गिर्यारोहक (Mountaineering) अद्याप बेपत्ता असल्याचे समजते. १७ हजार फूट उंचीवर असलेल्या द्रौपदीच्या (Draupadi) दांडा-२ शिखरावर मंगळवारी गिर्यारोहकांना हिमस्खलनाचा तडाखा बसला होता. उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदीच्या दांडा-२ शिखरावर १७,००० फूट उंचीवर झालेल्या भीषण हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये प्रसिद्ध गिर्यारोहक सविता कंसवाल (Savita Kanswal) यांचा समावेश होता.
कंसवाल यांनी १५ दिवसांत एव्हरेस्ट (Mount Everest) आणि मकालू (Makalu) पर्वतावर चढाई करून राष्ट्रीय विक्रम (National record) केला होता. उत्तरकाशीस्थित नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (NIM) चे प्राचार्य कर्नल अमित बिश्त यांनी बुधवारी कंसवाल यांच्या मृत्यूची पुष्टी केली. पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीनुसार हे प्रशिक्षणार्थी पश्चिम बंगाल (West Bengal), दिल्ली (Delhi), तेलंगणा (Telangana), तामिळनाडू (Tamilnadu), कर्नाटक (Karnatak), आसाम (Assam), हरियाणा (Hariyana), गुजरात (Gujrat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेशमधील (UP) आहेत. याबाबत hindi.news18.com यासह अनेक राष्ट्रीय माध्यम समूह आणि न्यूज पोर्टल यांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
Uttarkashi avalanche: Rescue operation underway, I am monitoring the situation: Pushkar Singh Dhami
Read @ANI Story | https://t.co/GwuWKAAIKA#uttarkashiavalanche #rescueoperation #pushkarsinghdhami pic.twitter.com/aEOteLBDTX
— ANI Digital (@ani_digital) October 6, 2022