Himachal Elections : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका (Himachal Elections) डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस (Congress) पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतही कुटुंबवादाचा ठसा उमटताना दिसत आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षावर विरोधी पक्ष आरोप करत आहेत. काँग्रेसने 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यापैकी जवळपास 13 उमेदवार असे आहेत जे राजकीय घराण्याशी संबंधित आहेत.
या यादीत हिमाचल प्रदेशचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि शिमा ग्रामीण मतदारसंघातून पक्षाचे विद्यमान आमदार विक्रमादित्य सिंह, जुब्बल-कोथकाई मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री राम लाल ठाकूर यांचा मुलगा रोहित ठाकूर यांच्या नावाचाही समावेश आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस पक्षाने मंडीमधून कौल सिंह ठाकूर यांची मुलगी चंपा ठाकूर, धर्मशाळामधून माजी मंत्री पंडित संत राम यांचा मुलगा सुधीर शर्मा, माजी विधानसभा अध्यक्ष ब्रिजबिहारीलाल बुटेल यांचा मुलगा आशिष बुटेल यांना उमेदवारी दिली आहे. पालमपूर येथून माजी मंत्री जी. एस. बाली यांचा मुलगा रघुवीर सिंग बाली यांना नगरोटा बागवान विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. माजी खासदार केडी सुलतानपुरी यांचे पुत्र विनोद सुलतानपुरी यांना कसौलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय माजी मंत्री महाजन यांचे पुत्र अजय महाजन यांना नूरपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सोहनलाल ठाकूर हे सुंदरनगरचे माजी आमदार शेरसिंह ठाकूर यांचे बंधू आहेत. काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या 46 उमेदवारांच्या यादीत सर्व 19 विद्यमान आमदारांना पुन्हा रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्याचबरोबर 6 नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. किन्नौरचे विद्यमान आमदार जगतसिंह नेगी यांचे तिकीट अद्याप निश्चित झालेले नाही. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कांगडा आणि मंडी हे दोन जिल्हे सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ आहेत. कांगडामधील 15 विधानसभा जागांपैकी काँग्रेसने केवळ 10 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत, तर पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. त्याचप्रमाणे मंडी जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 2017 मध्ये विजयी झालेल्या बहुतांश आमदारांना पक्षाने तिकीट वाटप केले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) 44 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या.
- Congress President Election : अध्यक्षपदासाठी ‘या’ उमेदवारांत होणार टक्कर; पहा, कोण आहे निवडणूक मैदानात
- BJP: निवडणुकीआधी भाजपने केले ‘हे’ मोठे काम; पहा, कोणाला पाठविले घरी..
- Himachal Pradesh Election 2022 : भाजप-काँग्रेसच्या ‘त्या’ लोकांवर आम आदमीचा वॉच; पहा, काय आहे निवडणूक प्लान..