Himachal Election : नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मतदान प्रक्रिया संपली आहे. 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सरकार स्थापनेचा दावा करत आहेत. मतदानानंतर समोर येणाऱ्या समीकरणांनुसार अनेक जागांवर अपक्ष म्हणून काँग्रेस आणि भाजप विरोधात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत. बहुमतासाठी गरज पडल्यास नवीन राजकीय समीकरणे तयार होण्यास वेळ लागणार नाही. राज्यात सुमारे 12 जागांवर अपक्ष बळकट स्थितीत आहेत. दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही, तर अपक्ष निर्णायक भूमिकेत येतील. अशा स्थितीत भाजप-काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क सुरू केला आहे.
हिमाचलमध्ये यावेळी भरघोस मतदान झाले आहे. राजकीय जाणकारांच्या मते आता मतदानाचा कल बदलला आहे. जास्त मतदान सत्तेच्या बाजूने होईल की विरोधात होईल हे सांगणे कठीण आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर, काँग्रेस नेते रामलाल ठाकूर यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या भागात जास्त मतदान झाले आहे. त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. या कारणामुळे राजकीय जाणकारांचे गणित काही निष्पन्न होत नाही.
थिओग, चौपाल, अर्की या तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे असंतुष्ट नेते रिंगणात होते. तिघांच्याही रॅलीत लोकांची गर्दी जमली होती. याशिवाय नालागड, अनी, हमीरपूर, किन्नौरमध्ये दोन्ही पक्षांतील नेत्यांनी बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. बारसर, कारसोग, सुंदरनगर, पच्छाड, मंडी, बिलासपूर, बंजार, चंबा, फतेहपूर, जसवान परागपूर येथेही अपक्षांनी स्पर्धा रंजक केली.
प्रत्येक निवडणुकीत पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन नेते स्वतंत्र मैदानात उतरतात. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यातील बहुतांश पक्ष उमेदवाराचे समीकरण बिघडविण्याचा प्रयत्न करतात, मात्र काहींना जनमानस मिळवण्यात यश येत आहे. या सर्वांना नंतर पक्षात घेतले जाते, अशी राज्यात परंपरा आहे.
- हे वाचा : Himachal Pradesh Elections : निवडणुकीआधीच भाजप हैराण; पहा, ‘त्या’ उमेदवारांनी काय केलाय प्लान..
- Himachal Pradesh Election 2022 : भाजप-काँग्रेसच्या ‘त्या’ लोकांवर आम आदमीचा वॉच; पहा, काय आहे निवडणूक प्लान..