Highest FD Rates : अनेकजण सरकारी योजना तर काहीजण बँकेत पैशांची गुंतवणूक करतात. जास्त व्याजदर मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांचा कल असतो. अनेकांना सर्वात जास्त व्याज कुठे मिळते? हे माहिती नसते. पण तुम्ही आता काही बँकांमधून पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा FD वर जास्त व्याज मिळवू शकता.
अनेकजण काही काळ बँकेत रक्कम निश्चित करून रकमेवरील व्याजदराचा लाभ घेतात. समजा जर तुम्हाला तुमचे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही त्या बँकांबद्दल जाणून घेऊ शकता ज्या सुकन्या समृद्धी किंवा जनरल भविष्य निर्वाह निधीपेक्षा आपल्या ग्राहकांना जास्त व्याजदर देत आहेत. त्यामुळे आता अशा दोन बँकांबद्दल जाणून घेऊया ज्या FD वर जास्त व्याज देत आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
हे लक्षात घ्या की युनिटी स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना ४.५% ते ९% पर्यंत व्याजदर देत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना ९.५% पर्यंत वार्षिक व्याज मिळते. या टक्केवारीच्या व्याजदराचा लाभ 1001 दिवसांच्या कालावधीत उपलब्ध करून दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीवर 4.5% ते 9.5% व्याज देण्यात येत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
हे लक्षात घ्या की सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक मुदत ठेवींवर 9.60 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे. ही बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 4 टक्के ते 9.1 टक्के व्याजदर उपलब्ध करून देत आहे. तर ५ वर्षांच्या FD वर ९.१ टक्के पर्यंत व्याज देण्यात येत आहे. तर, नियमित ग्राहकांना ५ वर्षांच्या एफडीवर ९.१० टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर 9.60 टक्के व्याजदराचा लाभ तुम्हाला घेता येईल.