Highest FD Rate । या बँका देत आहेत 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, गुंतवणुकीवर मिळेल जबरदस्त परतावा

Highest FD Rate । अनेकजण बँकेत पैसे गुंतवतात. बरेच जण जास्त व्याज देणाऱ्या बँकेत पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. काही बँका अशा आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. कोणत्या आहेत या बँका जाणून घेऊयात.

आयकर कायद्याच्या कलम 80TTB अंतर्गत, तुम्ही या उत्पन्नावर 50,000 रुपयांपर्यंतची वजावट मिळवू शकता. त्यामुळे ते आणखी फायदेशीर ठरेल. मागील काही काळापासून बँकांकडून एफडीवर चांगले व्याज देण्यात येत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

या बँकेकडून, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेव रकमेवर 4.50% ते 9.10% पर्यंत व्याज देण्यात येते. बँकेचा सर्वोच्च व्याज दर 9.10% असून तो दोन वर्षे आणि दोन दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर देण्यात येतो. हे दर 22 डिसेंबर 2023 पासून लागू केले आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 4.50% ते 9.50% व्याज देत आहे. 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध सर्वात जास्त व्याज दर 9.50% आहे. बँकेने हे दर 2 फेब्रुवारी 2024 पासून लागू केले आहेत.

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक सामान्य लोकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवींवर 4% ते 9% व्याज देत असून 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर जास्तीत जास्त 9% व्याज देण्यात येते. सामान्य गुंतवणूकदारांना देऊ केलेल्या दरांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याज मिळते. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू केले आहेत.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत, 3.60% ते 9.21% पर्यंतचे व्याज 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना देत असून या बँकेत सर्वात जास्त व्याज दर 9.21% आहे, जो 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध करून दिले आहे. बँकेने 28 ऑक्टोबर 2023 पासून हे दर लागू केले आहेत.

जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर ३.५०% ते ९% व्याज देत असून सर्वात जास्त व्याज दर 9% आहे, जो 365 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे. बँकेने 2 जानेवारी 2024 पासून हे दर लागू करण्यात आले आहेत.

Leave a Comment