High mileage bikes : या 115 सीसी इंजिन बाईक्स देतात सर्वाधिक मायलेज, किंमतही आहे खूपच कमी…

High mileage bikes : बाजारात अशा काही बाईक्स आहेत ज्या तुम्हाला खूप कमी किमतीत खरेदी करता येतील. विशेष म्हणजे या बाईकमध्ये तुम्हाला सर्वात जास्त मायलेज मिळेल. कोणत्या आहेत या बाईक्स आहेत? जाणून घ्या.

बजाज CT110X

बजाजची ही हायस्पीड बाईक आहे, जी रस्त्यावर 90 किमी प्रतितास इतक्या वेगाने पोहोचते. खराब रस्त्यांसाठी, याला टेलीस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक शोषक सस्पेन्शन प्रदान केले आहे, ज्यामुळे धक्के कमी होतात.

किमतीचा विचार केला तर बजाज CT110X ची सुरुवातीची किंमत 69626 रुपये एक्स-शोरूममध्ये दिली जात आहे. ही नवीन पिढीची बाइक असून ज्यात उच्च पिकअपसाठी 115.45 सीसी इंजिन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक फक्त 8 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडेल. कंपनीची ही शानदार बाईक 70 kmpl पर्यंत मायलेज देते.

बजाजच्या बाइकची फीचर्स

या बाईकचे वजन 127 किलो आहे.
4 स्पीड गिअरबॉक्स आणि 8.6 पीएस पॉवर
गोल प्रकाश आणि साधे हँडलबार
ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील्स

Hero HF Deluxe

कंपनीची ही जबरदस्त बाईक 11 रंगांमध्ये उपलब्ध आहे. किमतीचा विचार केला तर या हिरो बाईकचे बेस मॉडेल ६९२७३ रुपयांच्या ऑन रोड किमतीत उपलब्ध आहे. Hero HF Deluxe मध्ये 97.2 cc इंजिन आहे, जे 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. या कंपनीचा दावा आहे की ही बाईक 65 Kmpl मायलेज देईल. या बाईकमध्ये सहा प्रकार उपलब्ध असून यात अलॉय व्हील आणि स्टायलिश हँडलबार देण्यात आला आहे.

Hero HF Deluxe चे फीचर्स

4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन
एकत्रित ब्रेकिंग प्रणाली मिळेल.
8.05 Nm टॉर्क जनरेट होतो.
बाईकच्या सीटची उंची 805 मिमी आहे.
9.1 लीटरची मोठी इंधन टाकी

Leave a Comment