High Cholesterol : खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? आजच आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश

High Cholesterol : सध्याच्या धावपळीच्या युगात कोलेस्ट्रॉल वाढणे ही मोठी समस्या बनली आहे. पण समजा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर याचा सर्वात जास्त धोका हा आपल्या हृदयाला होतो. कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर दैनंदिन आहारातील अन्न महत्वाची भूमिका बजावत असतात.

जर तुम्ही वेळीच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणले नाही तर तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सुपरफूड गुणकारी ठरतात. या आहारामुळे तुमच्या शरीरातले खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

संत्र्याचा रस

हे लक्षात घ्या की संत्र्याचा रस कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतो. यासाठी दररोज तीन कप संत्र्याचा रस पिणे खूप फायदेशीर आहे.

अंकुरलेली कडधान्ये

उडीद, राजमा हरभरा आणि सोयाबीनपासून बनवलेले अंकुरलेले कोशिंबीर किंवा चाट आपली पचनशक्ती संतुलित ठेवते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून देखील आराम देते. इतकेच नाही तर कोलेस्ट्रॉलची समस्याही दूर करते.

हिरव्या पालेभाज्या

अनेक जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ई शिवाय लोह आणि कॅल्शियम हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळत असते. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

बदाम

तुम्ही 4 ते 6 बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी ते खा. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये फायबर, प्रोटीन आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात आढळत असतात.

भुईमूग

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रथिने आणि जीवनसत्त्वे असणारे शेंगदाणे खाल्ले तर खराब कोलेस्टेरॉलही कमी होऊ शकते. यासाठी दररोज 50 ग्रॅम सेवन करा.

Leave a Comment