High BP Symptoms । डोकेदुखीकडे दुर्लक्ष करताय? असू शकतं रक्तदाबाचे लक्षण, वेळीच करा उपचार

High BP Symptoms । जर तुम्ही डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच लक्ष द्या. कारण ते उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर त्याचा तुम्हाला फटका बसेल.

छाती दुखणे

उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी निगडित समस्या निर्माण होतात. त्यामुळे जर तुम्हालाही छातीत दुखत असेल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. एकदा डॉक्टरांकडे जा आणि चेकअप करून घेऊन उपचार सुरु करा.

डोकेदुखी

अनेकदा डोकेदुखीकडे दुर्लक्ष केले जाते. पण डोकेदुखी हे उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. ज्यावेळी पुरेशा प्रमाणात रक्त डोक्यापर्यंत पोहोचत नाही तेव्हा डोक्यात जडपणा जाणवतो.

उलट्या आणि चक्कर

समजा जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही पडणार आहात किंवा सकाळी झोपेतून उठताना तुम्हाला चक्कर येत असल्यास ते हाय बीपीचे लक्षण असू शकते. उलट्या होणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे.

थकवा

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असल्यास एकदा डॉक्टरांना नक्की भेट द्या जेणेकरून योग्य वेळी उपचार करता येऊ शकतो. थकवा आणि अशक्तपणा ही उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे असण्याची शक्यता आहे.

धूसर दृष्टी

महत्त्वाचे म्हणजे आपले हृदय रक्त पंप करण्यास मदत करते परंतु उच्च रक्तदाब असल्यास ते नीट कार्य करू शकत नाही. त्यामुळे दृष्टी धूसर होत जाते. तुम्हालाही अचानक काही गोष्टी अस्पष्ट दिसत असेल तर हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.

Leave a Comment