Hero Splendor Plus Xtec : भारतीय बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून धुमाकूळ घालणारी बाईक हिरो स्प्लेंडर प्लस आता मोबाईलच्या किमतीमध्ये खरेदीची एक उत्तम संधी तुम्हाला मिळत आहे .
सध्या बाजारात हिरो स्प्लेंडर प्लसवर एक भन्नाट ऑफर मिळत आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही कमी किमतीमध्ये ही बाईक घरी आणू शकतात. ही ऑफर Hero Splendor Plus Xtec वर उपलब्ध आहे.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Hero Splendor Plus Xtec ची किंमत 75,446 रुपये (एक्स-शोरूम ) आहे, जी ऑन-रोड 90,767 रुपये आहे. तसे, जर तुम्ही ही बाईक आता खरेदी केली तर तुम्हाला सुमारे 90 हजार रुपये खर्च करावे लागतील. पण चांगली गोष्ट म्हणजे फायनान्स प्लॅन कंपनीकडून दिला जात आहे. ज्याद्वारे तुम्ही ते अगदी कमी किमतीत खरेदी करू शकाल.
Hero Splendor Plus Xtec फायनान्स प्लॅन
फायनान्स प्लॅन अंतर्गत ही बाइक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 81767 रुपये कर्ज घ्यावे लागेल. बाईक घेण्यासाठी तुम्हाला फक्त 9000 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल. उर्वरित रकमेची परतफेड करण्यासाठी निश्चित मासिक हप्ता (EMI) भरावा लागेल.
कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 3 वर्षे म्हणजेच 36 महिने दिले जातील. यासह, कर्जावर वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज भरावे लागेल.
Hero Splendor Plus Xtec इंजिन
कंपनीने यात 97.2cc एअर कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. या इंजिनमध्ये 5.9 kW पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. यात 9.8-लिटरची इंधन टाकी देखील मिळते, जी लेटेस्ट प्रोग्राम केलेल्या इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानासह येते.
सस्पेन्शनच्या बाबतीत, याला टेलीस्कोपिक हायड्रॉलिक शॉकप्सर आणि मागील बाजूस 5-स्टेप अॅडजस्टेबल हायड्रॉलिक शॉकप्सर असलेला स्विंगआर्म देण्यात आला आहे.
Hero Splendor Plus Xtec फीचर्स
यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, सेगमेंट-फर्स्ट पूर्ण डिजिटल मीटर, संपूर्ण डिजिटल डिस्प्ले आणि इनकमिंग आणि मिस्ड कॉल अलर्ट यांसारखी बेस्ट फीचर्स मिळतील. यासोबतच एलईडी हाय इंटेन्सिटी पोझिशन लॅम्प (HIPL), फंकी बॉडी ग्राफिक्ससह चार नवीन कलर पर्यायही उपलब्ध असतील.