Hero Splendor Plus : भारतीय बाजारातील Hero ही सर्वात आघाडीची कंपनी आहे. कंपनीच्या बाईकमध्ये शानदार फीचर्स मिळते. तसेच या कंपनीच्या बाईकमध्ये जबरदस्त मायलेज मिळते. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कंपनी आपली नवीन बाईक लाँच करणार आहे. ज्यात तुम्हाला 73kmpl मायलेज मिळेल.
Hero Splendor Plus XTEC 2.0: इंजिन आणि मायलेज
हे लक्षात घ्या की नवीन जनरेशन स्प्लेंडर प्लसमध्ये 100cc i3s इंजिन देण्यात आले आहे जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स मिळतील. या कंपनीचा दावा आहे की हे इंजिन अधिक चांगले मायलेज देऊ शकते आणि 6000 किलोमीटरपर्यंत सेवेची गरज भासणार नाही. ते प्रति लिटर 73 किमी मायलेज देईल. या बाइकला 5 वर्षे किंवा 70,000 किलोमीटरची वॉरंटी मिळणार आहे.
Hero Splendor Plus
कंपनीच्या या नवीन बाइकमध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला रियल टाइम मायलेजची माहिती मिळेल. इतकेच नाही तर यात ब्लूटूथ, कॉल, एसएमएस आणि बॅटरी अलर्टची सुविधा पाहायला मिळेल. इतकेच नाही तर यात यूएसबी पोर्ट असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फोन चार्ज करता येईल.
सुरक्षितता आणि डिझाइन
सर्वात महत्त्वाचे म्हणजे Hero Splendor Plus या बाइकच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बाईकची साधी रचना ही तिची ओळख आहे. पण त्यात नवीन ग्राफिक्स आणि लाल रेषा पाहायला मिळतील. तसेच बाइकच्या पुढील आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेकची सुविधा असणार आहे, याशिवाय यात एलईडी टेललाइट आणि हेडलाइट आहे.