Hero Splendor Plus : स्वस्तात दमदार मायलेज देणारी बाईक खरेदी करायचीय? ‘ही’ बाईक आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय

Hero Splendor Plus : भारतीय बाजारात अनेक कंपन्या आपल्या शानदार फीचर्स देणाऱ्या बाईक लाँच करत आहेत. पण उत्तम फीचर्स असल्याने या बाईक च्या किमती जास्त आहेत. त्यामुळे अनेकजण स्वस्त आणि दमदार मायलेज देणारी बाईक खरेदी करत आहेत.

Hero Splendor Plus बाईकचे इंजिन

तुम्ही स्वस्तात Hero Splendor Plus बाईक खरेदी करू शकता. सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की या बाईकची सीटची उंची 785 मिमी इतकी आहे, ज्यामुळे ही बाईक शहरातील गुळगुळीत रस्ते असो किंवा चिखलमय रस्ते यावर उच्च कार्यक्षमता देते. या शानदार बाईकमध्ये 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. तसेच बाईकमध्ये 97.2 cc चे पॉवरफुल इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. किंमत ९० हजारांपेक्षा कमी आहे.

मिळतील चार प्रकार आणि 7 रंग पर्याय

Hero Splendor Plus चे वजन 112 kg असून ते खराब रस्त्यावर नियंत्रित करणे सोपे आहे. या बाईकमध्ये चार प्रकार आणि 7 रंग पर्याय उपलब्ध आहेत. ही बाईक बाजारात Honda Shine 100 आणि TVS Radeon ला जोरदार टक्कर देते.

Hero Splendor Plus चे जबरदस्त फीचर्स

  • या बाईकमध्ये कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे.
  • सेल्फ स्टार्ट आणि अलॉय व्हील्स.
  • कंपनीची बाइक ड्रम ब्रेकसह येते.
  • साधे हँडलबार आणि डिजिटल कन्सोल
  • रुंद आणि आरामदायक आसन आकार
  • स्टँडर्ड साइड स्टँड आणि एक्झॉस्ट
  • 8000 चा उच्च आरपीएम तयार होतो.
  • चेन कव्हर, टर्न इंडिकेटर

Leave a Comment