Hero Karizma XMR : स्टायलिश लुक आणि 210cc इंजिनसह खरेदी करता येईल हिरोची ‘ही’ बाईक, किंमत आहे फक्त..

Hero Karizma XMR : हल्ली तरुणांच्या रेसर लुक आणि हाय पॉवर बाईक खूप पसंतीस उतरत आहेत. मागणी जास्त असल्याने कंपन्या देखील आपल्या शानदार फीचर्स आणि उत्तम मायलेज असणाऱ्या बाईक्स बाजारात लाँच करत आहेत. अशीच बाजारात हिरोची Hero Karizma XMR बाइक आहे. ज्यात 35 kmpl पर्यंत मायलेज मिळते.

मिळेल लिक्विड-कूल्ड इंजिन

हे लक्षात घ्या की नवीन Hero Karizma XMR हे लिक्विड-कूल्ड इंजिनसह येते, हे इंजिन खास लांबच्या राइड्ससाठी तयार करण्यात आले आहे. या इंजिनची खासियत म्हणजे हे इंजिन लवकर गरम होत नाही आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात उच्च कार्यक्षमता देते. या दमदार बाइकमध्ये आरामदायी सीट डिझाइन आहे.

जाणून घ्या किंमत आणि ABS

किमतीचा विचार केला तर नवीन Hero Karizma XMR 1.79 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफर करण्यात येत आहे. यात 11 लीटरची इंधन टाकी दिली असून या बाइकला अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टमसह डिस्क ब्रेकची अतिरिक्त सुरक्षा मिळते.

ॲडजस्टेबल विंडस्क्रीन

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बाइकमध्ये हाय पॉवर इंजिन दिले आहे, जे हाय स्पीडसाठी 25.15 bhp पॉवर आणि 20.4 Nm टॉर्क जनरेट करते. Karizma XMR मध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. तसेच त्यात ॲडजस्टेबल विंडस्क्रीनचा पर्यायही उपलब्ध आहे. कंपनीची ही बाईक मोबाईल चार्जिंगसाठी USB पोर्टसह येते.

लाइटवेट क्लिप-ऑन हँडलबार

Hero Karizma XMR च्या सीटची उंची 810 mm असून या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, लाइटवेट क्लिप-ऑन हँडलबार आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखी शानदार फीचर्स मिळतील. बाइक एलईडी हेडलाइट आणि टेललाइटसह खरेदी करता येईल. तर बाजारात ही बाईक Suzuki Gixxer SF 250 आणि Yamaha R15 V4 ला कडवी टक्कर देईल.

Leave a Comment