China : नेपाळ एअरलाइन्सला (Nepal Airlines) मोठा तोटा सहन करावा लागत आहे. याचे एक कारण म्हणजे चीनमध्ये (China) बनवलेले विमान. आता ही विमाने कोणीही भाडेतत्त्वावर घेऊ इच्छित नसल्याने नेपाळ एअरलाइन्सने आपली पाच चिनी बनावटीची विमाने विकण्याचा निर्णय (Nepal sell 5 Chinese plane) घेतला आहे. नेपाळी मीडियानुसार, या विमानांनी हवेपेक्षा जमिनीवर जास्त वेळ घालवला. ही विमाने कर्जबाजारी नेपाळ एअरलाइन्सचा आर्थिक ताण आणखी वाढवित होती.
नेपाळ एअरलाइन्सने 8 वर्षांपूर्वी चिनी विमानांची पहिली तुकडी घेतली होती. आता अखेर विमान कंपन्यांनी अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनंतर त्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. 2012 मध्ये, नेपाळ सरकारने चीनकडून चार Y12E आणि दोन MA60 विमानांच्या खरेदी कराराचा विस्तार केला. यापैकी एक विमान अपघातानंतर उडण्याच्या परिस्थितीत राहिले नाही, तर उर्वरित पाच विमाने (Aeroplane) विमानतळाच्या पार्किंगमध्ये उभे आहेत.
देखभाल समस्या आणि स्पेअर पार्ट्सची कमतरता याशिवाय नेपाळ एअरलाइन्सला विमान उडवण्यासाठी वैमानिकही मिळत नाहीत. या सर्व समस्यांनंतर आता ती विमाने ठेवण्यात काही अर्थ नाही, असे अहवालात म्हटले आहे. नेपाळ एअरलाइन्सने बोली लावण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे. नेपाळ एअरलाइन्सच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यापुढे ही विमाने कोणी भाडेतत्त्वावर देईल असे त्यांना वाटत नाही.
ही विमाने कोणालाही विकण्याची तयारी ठेवा, असे निर्देश अर्थ मंत्रालयाने महामंडळाला दिल्याचे सांगितले जाते. 2014 मध्ये नेपाळने (Nepal) चिनी विमान (Chinese Plane) खरेदी केल्यानंतर ही विमाने डोकेदुखी बनली होती. आता तोटा वाढत असल्याने ही विमाने तोट्याच्या भावात विकावी लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये, नेपाळ एअरलाइन्स कॉर्पोरेशन (NAC) ने विमान खरेदीसाठी चीन सरकारचा उपक्रम असलेल्या Aviation Industry Corporation of China (AVIC) सोबत व्यावसायिक करार केला.
त्यावेळी, चीनने 408 दशलक्ष चीनी युआन, 6.67 अब्ज नेपाळी रुपयांच्या समतुल्य अनुदान आणि सवलतीच्या कर्जाची मदत दिली. एकूण मदतीपैकी 180 दशलक्ष युआन (नेपाळी रु. 2.94 अब्ज) अनुदान एका MA60 आणि एका Y12e विमानासाठी दिले गेले. इतर विमाने चीनच्या बँकेने (Chinese Bank) प्रदान केलेल्या सॉफ्ट लोनसह (Soft Loan) 228 दशलक्ष युआन (नेपाळी रुपये 3.72 अब्ज) मध्ये खरेदी करण्यात आली.
- Must Read : China : श्रीलंकेनंतर आता ‘हा’ देश फसतोय चीनच्या जाळ्यात; पहा, चीनने काय केला कारनामा..
- Nepal : चीनी विमानांनी ‘या’ देशाला दिला झटका.. उत्पन्न तर नाहीच पण कर्जाच्या व्याजावरच कोट्यावधींचा खर्च
- China Taiwan Tension : चीनचे टेन्शन वाढणारच.. अमेरिकेने तैवानसाठी केला ‘हा’ खास प्लान..
- Russia Ukraine War : युक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रशिया भडकला; युक्रेनला थेट दिला ‘हा’ इशारा