Heavy Rain Update: Bengaluru: बुधवारी संध्याकाळी बंगळुरूमध्ये (Bengaluru)पुन्हा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी ‘पूर’सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामध्ये पूर्व, दक्षिण आणि मध्य भागात सर्वात वाईट परिस्थिती निर्माण झाली. या भागांसोबतच बेलंदूर केआयटी झोनमध्ये (Bellandur KIT Zone) पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या उत्तर भागात ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने (Department of Meteorology) दिला आहे.
पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी ७.३० च्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने कार्यालयात जाणाऱ्यांची अडचण झाली. त्यांनी मेट्रो स्टेशनवर (Metro Station) आसरा घेतला. मॅजेस्टिकजवळ मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने तेथे उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचे नुकसान झाले.
#Bengaluru roads have turned into rivers! #rain #Thunder pic.twitter.com/7RVGM4rFe8
— Ram Rakshith V (@RamRakshith16) October 19, 2022
Blasting rains here in #Bengaluru. Intense storms dumping rains over the city. Intense thundershowers to continue for next 1-2 hrs
Steering is NE. Huge localised floods loading. Drive safe & stay indoors #BengaluruRains #BangaloreRains #BengaluruRain #BangaloreRain #Bangalore pic.twitter.com/YYC0W7w144
— ಕರ್ನಾಟಕ/ಬೆಂಗಳೂರು ಹವಾಮಾನ (@Bnglrweatherman) October 19, 2022
यापूर्वीही अशाच घटना घडल्या होत्या
गेल्या महिनाभरात अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील परिस्थिती बिकट झाली होती. तीन दिवस पाऊस पडत होता. यानंतर प्रशासन आणि राजकीय पक्षांमध्ये संघर्ष सुरू झाला. ज्या ठिकाणी अनेक जागतिक कंपन्या आहेत त्या ठिकाणी शहरात पूर आला होता. या ठिकाणी अनेक स्टार्टअप्स (Startups) त्यांची कार्यालयेही चालवत आहेत. या सर्व ठिकाणी पाणी साचले होते. अनेक ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर यायला अनेक दिवस लागले. रस्त्यावर पाणी साचल्याने व वीजपुरवठा खंडित (Power outage) झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
शाळांना सुट्टी, नोकरदारांना घरून काम
काही पॉश भागातही पाणी साचल्याने लोकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यानंतर तेथील लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने ट्रॅक्टर लावले होते. त्यादरम्यान प्रशासनाने स्थानिक शाळा बंद करण्याचे आदेश जारी केले होते. याशिवाय इतर नोकरी करणाऱ्यांना प्रशासनाने घरून काम करण्यास सांगितले होते. मुसळधार पावसात विमाने चालवण्यातही अनेक अडचणी आल्या. त्याचवेळी पाण्यात बुडणारी महागडी वाहने, बचावकार्य आदींचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले.
- हेही वाचा:
- IMD Rain Alert : दिवाळीत पावसाचे सावट; हवामान विभागाने ‘या’ भागात दिलाय मुसळधार पावसाचा इशारा
- Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले ‘हे’ आवाहन
- Agriculture News: केळी-भाजीपाला पिकाची ‘ही’ घ्या काळजी; लम्पीवरही करा प्रतिबंधक उपाययोजना