Heavy Rain : शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. सतत होणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असून घरे पडली आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात आणखी काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला असून नगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यातही जोरदार आहे. पाऊस पडत आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान तब्बल 518 मिमी पाऊस पडला आहे. अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी पाऊस कमी झालेला नाही. अजूनही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) होत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. धरणातून (Dam) पाणी विसर्गात वाढ झाली आहे. नगर, पुणे (Pune) व नाशिक (Nashik) जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले
सोमवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व पाथर्डी वगळता अन्य 12 तालुक्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात आतापर्यंत 518 मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) जामखेड तालुक्यात 47 टक्के तर पाथर्डी तालुक्यात 94 टक्के पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित तालुक्यांत मात्र शंभर टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नगर शहर व परिसरात सोमवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती.